PubG होणार ठप्प जी! आणखी ४७ चायनीज ऍपवर बंदी

ऍपवर गदा आणली आहे

Updated: Jul 28, 2020, 10:01 AM IST
PubG होणार ठप्प जी! आणखी ४७ चायनीज ऍपवर बंदी  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : चीनी बनावटीच्या ५९ ऍसपवर सक्कीची बंदी आणल्यानंतर आता भारत सरकारकडून चीनला आणखी एक झटका देण्यात आला आहे. आता सरकारकडून आणखी ४७ ऍप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनी ऍपचे क्लोन असनारे हे ऍप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये TikTok lite, Cam Scanner advance चा समावेश आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार सरकारकडून २५७ चीनी ऍपवर गदा आणली आहे. लवकरच आणखी ऍपची यादीही जाहीर करण्यात येणार आहे. या ऍपवर युजर्सची माहिती चोरण्याचा आरोप करण्यात आला आहे. 

सरकारकडून तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये असणाऱ्या या ऍची राष्ट्रीय सुरक्षेचं उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी केली जाऊ शकते. चीनी बनावटीच्या वस्तूंवर निर्बंध आणण्याचं सत्र सुरु केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 
डेटा सिक्युरिटीसाठी उचललं पाऊल 

भारत- चीन तणावाच्या वातावरणात चायनीज बनावटीच्या सर्व ऍपवर भारत सरकारची करडी नजर आहे. ज्या माध्यमातून या ऍप्सची पडताळणी करत त्यापासून असणारा संभाव्य धोका अंदाजात घेतला जात आहे. शिवाय या ऍप्सच्या माध्यमातून देशाच्या संरक्षणाला कोणताही धक्का न पोहोचवण्यासाठी आणि युजर्सच्या खासगी माहितीबाबत गोपनीयता पाळली जाण्याविषयी सरकार प्रय़त्नशील आहे. 

PUBG होणार ठप्प जी! 

 

सरकारकडून देण्यात आलेल्या नव्या यादीमध्ये PUBG, Tencent, Xiaomi आणि इतरही ऍपचा समावेश आहे. याशिवाय मीटू, LBE टेक, परफेक्ट कॉर्प, सिना कॉर्प, नेटेज गेम्स आणि यजु ग्लोबलचाही या यादीत समावेश आहे. मुख्य म्हणजे PUBG ला भारतात असणारी एकंदर लोकप्रियता आणि हा गेम खेळण्यासाठी हे ऍप वापरणाऱ्यांची संख्या पाहता मोठ्या वर्गात निराशाही पाहायला मिळत आहे.