Car Tips: टायर पंक्चर होण्यापूर्वी हे छोटे उपकरण करणार अलर्ट, किंमत वाचाल तर आजच घ्याल

 आज आम्ही तुम्हाला अशा एका उपकरणाबद्दल सांगणार आहोत, जे प्रत्येक कारमध्ये असणं गरजेचं आहे. चला तर मग या उपकरणाबद्दल जाणून घेऊयात  

Updated: Jul 24, 2022, 01:00 PM IST
Car Tips: टायर पंक्चर होण्यापूर्वी हे छोटे उपकरण करणार अलर्ट, किंमत वाचाल तर आजच घ्याल title=

Tyre pressure monitoring system at Affordable Price: गाडी घेतली की नुसती दारात उभी राहून उपयोग होत नाही. तर या गाडीचा वापर होणं गरजेचं आहे. अन्यथा ऐन मोक्याच्या वेळी गाडीत अडचणी येतात. अनेकदा गाडी दारात तशी उभी राहिल्याने टायरमधली हवा निघून जाते. कधी कधी प्रवास करताना टायर पंक्चर होऊन फुटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे प्रवासावेळी गाडीचे टायर व्यवस्थित आहेत की नाही? हे तापसणं गरजेचं आहे. पण इतकं करूनही ऐन प्रवासावेळी टायर पंक्चर होण्याच्या घटना घडतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका उपकरणाबद्दल सांगणार आहोत, जे प्रत्येक कारमध्ये असणं गरजेचं आहे. चला तर मग या उपकरणाबद्दल जाणून घेऊयात  

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम

महागड्या कारमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम उपलब्ध असते. परंतु मिड रेंज आणि एंट्री लेव्हल सेगमेंट कारमध्ये ही सिस्टम नसते. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या कारच्या टायरवर लक्ष ठेवते आणि काही सेकंदात होणार्‍या बदलांचीही माहिती देते. जर गाडीच्या टायरची हवा झपाट्याने जात असेल किंवा टायरमध्ये जास्त हवा असेल, तर त्याची माहिती तात्काळ मिळते. त्यामुळे टायर फुटण्याची किंवा पंक्चर होण्याची समस्या सहज टाळू शकता.  बऱ्याचदा टायरमध्ये हवा कमी किंवा जास्त असली तरी गाडी चालवता, यामुळे टायर खराब होतो. हे उपकरण तुम्हाला टायरची स्थिती सांगते.

हे उपकरण कसे कार्य करते?

प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीममध्ये दोन युनिट्स आहेत. एक युनिट मॉनिटर असते आणि दुसरे युनिट सेन्सर असते. सेन्सर पार्ट कारच्या टायरच्या कॅपमध्ये बसवला जातो आणि मॉनिटर कारच्या डॅश बोर्डवर असतो. जिथे तुम्हाला चारही टायर्सची वर्तमान स्थिती कळू शकते. या सिस्टममध्ये कारच्या प्रत्येक टायरसाठी एक कॅप उपलब्ध आहे आणि हा सेन्सर कॅप व्हॉल्व्हमध्ये बसतो आणि त्याचे काम सुरू करतो. टायरच्या हवेच्या दाबात कोणताही बदल झाल्यास याबाबत माहिती मिळते. हे एक अतिशय महत्त्वाचे उपकरण असून वेळ आणि पैसा वाचवू शकते. या उपकरणाची किंमत 2,500 ते 5,000 रुपये इतकी असून ऑनलाइन उपलब्ध आहे.