जगभरात विस्तारण्यासाठी ZEE5 आणि Apigate चा करार, मोबाईल काँग्रेसमध्ये घोषणा

इंटरनेट जगतातील मनोरंजन क्षेत्रातील ZEE5 ने आपला दबदबा कायम ठेवला आहे. बहुभाषीय डिजिटल मनोरंजनचा अॅप ZEE5ने आज एक महत्वाची घोषणा केली आहे.

Updated: Feb 26, 2019, 12:07 AM IST
 जगभरात विस्तारण्यासाठी ZEE5 आणि Apigate चा करार, मोबाईल काँग्रेसमध्ये घोषणा title=

बार्सिलोना : इंटरनेट जगतातील मनोरंजन क्षेत्रातील ZEE5 ने आपला दबदबा कायम ठेवला आहे. बहुभाषीय डिजिटल मनोरंजनचा अॅप ZEE5ने आज एक महत्वाची घोषणा केली आहे. ZEE5 ने सर्वभाषिक कार्यक्रमात मोठं नाव असलेल्या  Apigateशी हातमिळवणी केली आहे. अपिगेट जास्तच जास्त भाषांमध्ये जागतिक स्तरावरील कार्यक्रम निर्मितीत आघाडीवर आहे. 

ZEE5 ची निर्मिती झी इंन्टरटेन्टमेन्ट इंटरप्राईझ लिमिटेड म्हणजेच ZEELची निर्मिती आहे.  ZEEL ने १ लाख तासांचे भारतीय सिनेमे, टीव्ही शोज, बातम्या, संगीत, व्हिडीओज ऑफर केले आहेत.

यात इंग्रजी, हिंदीसह, बंगाली, पंजाबी, मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नडा, मराठी, ओरिया, भोजपुरी आणि गुजराथीचा समावेश आहे. तसेच यासह साठपेक्षा जास्त लोकप्रिय वाहिन्यांचे लाईव्ह टीव्ही चॅनेल्स देखील पाहता येणार आहेत, यात झीच्या लोकप्रिय वाहिन्यांचा देखील समावेश आहे.

ZEE एक निर्माता म्हणून आम्ही एक उत्तम, दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती करत आहोत, ती देखील विविध भाषांमध्ये. तसेच ZEE5 चा विस्तार जगभरात करण्याचं ठरवलं आहे. जगातील यामुळे झीच्या डिजिटल प्रेक्षक संख्या वाढणार आहे. तसेच अपिगेटशी हातमिळवणी झाल्यानंतर यात आम्हाला यश येणार असल्याचं झी इंटरनॅशनल आणि Z5 Global ग्लोबलचे सीईओ अमित गोयंका यांनी म्हटलं आहे.