लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाहा सोन्याचा दर

लक्ष्मीपूजनच्या निमित्तानं सोनं खरेदी करण्याकडे कल

Updated: Oct 27, 2019, 06:21 PM IST
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाहा सोन्याचा दर  title=

डोंबिवली : सोन्याचा आजचा दर प्रतितोळा ४० हजार २०० रुपयांच्या घरात आहे. धनत्रयोदशीला १ हजार रुपयांची वाढ झाली ती लक्ष्मीपूजेला म्हणजेच आजही कायम आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र लक्ष्मी पूजनाला सोनं खरेदी करण्याकडे आजही ग्राहकांचा कल आहे. 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी थोडंतरी सोनं खरेदी करण्याचं बोललं जातं. बाजारात सोन्याच्या भावात मोठी तेजी असली तरी, आजच्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताच्या दिवशी सोनं घेण्यासाठी ग्राहक सराफा बाजारात खरेदीसाठी आल्याचं पाहायला मिळत आहे. 

  

वाढत्या भावामुळे ग्राहकांचा कमी वजनाचे दागिने घेण्याकडे कल आहे. विक्रेत्यांकडून कमी वजन दागिने बाजारात ठेवले जात असून, आपल्या बजेटनुसार ग्राहक सोन्याची खरेदी करत आहेत.