काबुल एअरपोर्टच्या 3 गेटवर तालिबानचा ताबा, उड्डाणांवर परिणाम

तालिबान्यांनी विमानतळ रिकामे करण्याचे काम सुरू केले आहे.

Updated: Aug 30, 2021, 08:07 PM IST
काबुल एअरपोर्टच्या 3 गेटवर तालिबानचा ताबा, उड्डाणांवर परिणाम title=

काबुल : अमेरिकेने अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर दहशतवादी हल्ल्याला ड्रोन हल्ल्याद्वारे उत्तर दिले असले तरी तालिबानची भीती सातत्याने वाढत आहे. आता असे वृत्त आले आहे की अमेरिका आणि इतर सैन्याने काबूल विमानतळाच्या 3 दरवाजांचे नियंत्रण तालिबानच्या ताब्यात दिले आहे, त्यानंतर तालिबान्यांनी विमानतळ रिकामे करण्याचे काम सुरू केले आहे.

समूह अधिकारी इनहामुल्लाह सामानगनी यांनी रविवार याबाबत माहिती देताना म्हटलं की, 'आता अमेरिकेचे सैन्याकडे एअरपोर्टच्या एका लहान भागापुरतंच नियंत्रण आहे. जेथे एअरपोर्ट रडार सिस्टम देखील आहे.' तालिबानने दोन आठवड्यापूर्वी एअरपोर्टच्या मेन गेटनर एक यूनिट तैनात केले होते. जे एअरपोर्टची सुरक्षा आणि तांत्रिक गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी तयार होते.

अमेरिकेने तालिबानला एअरपोर्ट गेटचं नियंत्रण अशा वेळेस सुपूर्त केलं आहे. जेव्हा 26 ऑगस्टला ISIS-K च्या दहशतवाद्यांनी गेटवर हल्ला केला होता. ज्यामध्ये 170 अफगान आणि 13 अमेरिकन सैन्य मारले गेले होते.

शनिवारी उशीरा रात्रीपर्यंत सैन्याच्या विमानांसह अनेक विमानांनी येथून उड्डाण केलं. 15 ऑगस्टला तालिबानने अफगानिस्तानवर ताबा मिळवला होता. यानंतर 6,000 अमेरिकन सैन्य आणि इतर देशाचे सैन्य काबुल एअरपोर्टवर तैनात करण्यात आले होते. तालिबानने 31 ऑगस्टच्या आधी काबुल एअरपोर्ट सोडण्याचा इशारा अमेरिकेला दिला आहे.