ऑपरेशन समुद्र सेतू : मालदीव येथे अडकलेल्या भारतीयांना आणण्यास नौदलाचे जहाज पोहोचले

मालदीव इथे  ७०० पेक्षा जास्त अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतू सुरु करण्यात आले आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 23, 2020, 10:42 AM IST
ऑपरेशन समुद्र सेतू : मालदीव येथे अडकलेल्या भारतीयांना आणण्यास नौदलाचे जहाज पोहोचले title=

माले : मालदीव इथे  ७०० पेक्षा जास्त अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतू सुरु करण्यात आले आहे. भारतीय नौदलाच जहाज आय एन एस जलाश्व मालदिवच्या मेल बंदरात दाखल झाले आहे. मेल इथे भारतीयांची तपासणी आणि ओळखपत्र वितरणाच काम सुरू झाल्याची माहिती नौदलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. 

जागतिक महामारी कोरोना विषाणूच्या संकटामुळे शेकडो भारतीय मालदीवमध्ये अडकले आहेत. मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन समुद्र सेतू' मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत आयएनएस जलाश्व हे नौदल जहाज गुरुवारी माले पोर्टवर पोहोचले.

त्याचवेळी, भारतीय नागरिक शुक्रवारी मालदीवची राजधानी माले येथे पोहोचले, जिथे त्यांच्या मायदेशी परत जाण्यापूर्वी त्यांनी आवश्यक ते तपासणी आणि प्रक्रिया पार पाडली. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांनी ही माहिती दिली आहे. ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत मालदीवमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित आणि सुव्यवस्थेने आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी उच्च कमिशनचे अधिकारी आणि स्वयंसेवक पूर्ण संरक्षक उपकरणाने सज्ज आहेत, असे हाय कमिशनने सांगितले. लवकरच त्यांना रवाना करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, जलाश्व कोरोना विषाणूच्या साथीमुळे मालदीवमध्ये अडकलेल्या सुमारे ७५० भारतीयांनाआणण्यासाठी  जहाज गुरुवारी सकाळी माले येथे पोहोचल्याचे भारतीय नौदलाने सांगितले. नौदलाने निवेदनात म्हटले आहे की, हे जहाज समुद्र सेतूच्या या कारवाईचा एक भाग आहे. भारतीय नौदलाने विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणण्यास सुरुवात केली आहे. या जहाजामध्ये वैद्यकीय आणि प्रशासकीय सहाय्यक कर्मचार्‍यांसह मदत सामग्री, कोरोना व्हायरस बचाव सामग्री आहे.  जहाजात वैद्यकीय सुविधा आहेत. आम्ही जवळपास ७५० लोकांना आणू,असे नौदलाकडून सांगण्यात आले.