...म्हणून सोशल मीडियावर ‘हा’ पाकिस्तानी अँकर होतोय ट्रोल

अवघ्या काही सेकंदांच्या बेसावधपणामुळे हा सर्व प्रकार घडून आला.

Updated: Sep 23, 2018, 05:14 PM IST
...म्हणून सोशल मीडियावर ‘हा’ पाकिस्तानी अँकर होतोय ट्रोल  title=

मुंबई: सोशल मीडियावर दर दिवशी बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. मग तो एखादा व्हिडिओ असो किंवा फोटो. नेटकऱ्याचं लक्ष वेधणाऱ्या या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत येतात की पाहता पाहता त्यांना जणू एक प्रकारची प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात होते. सध्याच्या घडीला या सोशल मीडियाच्या जाळ्यात असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बातम्यांचं बुलेटीन सुरु होण्यापूर्वी वृत्तनिवेदकांची मजा मस्करी सुरु असल्याचं, या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.  

पत्रकार सय्यद रझा मेहदी या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. आशिया कपच्या निमित्ताने चालवण्यात येणाऱ्या खास पॅकेजसाठी हे दोन्ही वृत्तनिवेदक तयार होते.

कॅमेरा सुरु होऊन ते बुलेटीन ऑन एअर जाण्यास अद्यापही काही वेळ होता. त्याचवेळी या वृत्तनिवेदकाने असेकाही हातवारे केले ते पाहता सोशल मीडियावर अनेकांनीच त्यांची खिल्ली उडवत त्याविषयी उपरोधिक ट्विट करण्यास सुरुवात केली.

अवघ्या काही सेकंदांच्या बेसावधपणामुळे हा सर्व प्रकार घडून आला. सोशल मीडियावर मात्र अनेकांनाच चर्चेचा विषय मिळाला.