व्हिडिओ : पाकिस्तानातील पहिल्या शीख पोलिसाला कुटुंबासहीत घराबाहेर काढलं

१९४७ सालापासून ते लाहोरच्या डेरा चहल भागात राहत आहेत

Updated: Jul 11, 2018, 08:42 AM IST
व्हिडिओ : पाकिस्तानातील पहिल्या शीख पोलिसाला कुटुंबासहीत घराबाहेर काढलं title=

लाहोर : पाकिस्तानचा पहिला शीख पोलीस अधिकारी ठरलेल्या गुलाब सिंहसोबत दुर्व्यवहाराची घटना घडलीय. गुलाब सिंहनं केलेल्या आरोपानुसार, त्याला जबरदस्तीनं त्याच्या घरातून कुटुंबासहीत बाहेर काढण्यात आलं. त्याची पगडी खेचण्यात आली... आणि संपूर्ण कुटुंबाला धक्के देत घराबाहेर काढून घराला टाळं लावण्यात आलं. गुलाब सिंहनं आपल्यासोबत झालेला हा दुर्व्यवहार एका व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडलाय. पाकिस्तानात शीख बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराचा हा एक पुरावाच ठरलाय. गुलाब सिंहच्या म्हणण्यानुसार, १९४७ सालापासून ते लाहोरच्या डेरा चहल भागात राहत आहेत. 

आपला व्हिडिओ शेअर करताना गुलाब सिंहनं म्हटलंय... 'मी तुम्हाला विनंती करतो की माझी जास्तीत जास्त मदत करा आणि हा व्हिडिओ शेअर करा... सगळ्या जगाला सांगा की पाकिस्तानात शिखांवर कसा अन्याय केला जात आहे'

आणखी एका व्हिडिओत गुलाब सिंह आपल्या पत्नी आणि तीन मुलांसोबत घराच्या बाहेर उभे आहेत. 'माझं घर रिकामं करायचं होतं तर मला नोटीस द्यायला हवी होती' असंही या व्हिडिओत ते म्हणताना दिसत आहेत.