श्रीलंकेत पूरात ९१ जणांचा मृत्यू, भारताचा मदतीचा हात

मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे श्रीलंकेत ९१ जणांचा मृत्यू झालाय. तर ११० हून अधिक जण बेपत्ता झालेत.

Updated: May 27, 2017, 10:12 AM IST
श्रीलंकेत पूरात ९१ जणांचा मृत्यू, भारताचा मदतीचा हात title=

कोलंबो : मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे श्रीलंकेत ९१ जणांचा मृत्यू झालाय. तर ११० हून अधिक जण बेपत्ता झालेत.

या पूराचा फटका देशातील २० हजार नागरिकांना बसलाय. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत देशात ३०० ते ५०० मिमी पावसाची नोंद झालीय. काही भागात तर ६०० मीमी पाऊस बरसलाय. 

पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी श्रीलंकेचं हवाईदल आणि नौदल शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. दरम्यान श्रीलंकेवर ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी भारतानं मदतीचा हात पुढे केलाय.

अत्यावश्यक साधन सामुग्री असलेली दोन जहाजं भारतानं श्रीलंकेला पाठवलीत. यातलं एक जहाज आज कोलंबोमध्ये दाखल होईल तर दुसरं जहाज उद्या दाखल होणार आहे. श्रीलंकेतील नागरिकांवर ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दु:ख व्यक्त केलंय.