Manasi Naik Divorce : मराठी प्रेक्षकांनीच कणा मोडला; घटस्फोटाच्या बातम्यांवर मानसी नाईक नेमकं काय सांगू इच्छिते?
मराठी अभिनेत्री Manasi Naik नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावर मानसील सोशल मीडियावर मराठी प्रेक्षकांनी कशा प्रकारे तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली याविषयी सांगितलं आहे.
Manasi Naik Divorce : मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. (Entertainment News in Marathi) दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्यावर वक्तव्य केलं आहे.
मानसीनं माध्यमांशी साधलेल्या मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत वक्तव्य केलं आहे. 'प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपण एका राजकुमाराशी लग्न कराव. त्यात मी खूप रोमॅंटिक आणि प्राणीप्रेमीही आहे. मला लोकांना मदत करायला आवडतं. मी स्वामी भक्तही आहे. मला प्रेम हवं होतं. कुटुंब हवं होतं, म्हणून मी लग्न केलं,' असं मानसी म्हणाली.
हेही वाचा : 'मला जन्मच का दिला?' Amitabh Bachchan यांच्या मनात हा प्रश्न का घर करत होता?
पुढे मानसी म्हणाली,' लग्नानंतर माहेर आणि सासर अशा दोन्हीबाजूच्या संस्कृती सांभाळण्याचा मी प्रयत्न केला. मी शेवटपर्यंत पत्नीधर्म निभावला. समाजात मी ताठ मानेनं जगू शकेन असं वागली आहे. पण तरीही घटस्फोटाच्या बातमीनंतर मराठीचं लोक माझ्या पोस्टवर कमेंट करुन मला ट्रोल करत आहेत, याचं मला वाईट वाटतं. मी तुमचीच बहीण, मैत्रीण आहे.'
कोण आहे मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरा?
मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल ( Mansi Naik Husband Pradip Kharera )आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नसल्याचे काही नेटकऱ्यांच्या लक्षात आले आहे. फक्त मानसी नाही तर तिचा पती प्रदीप देखील नेहमीच मानसीसोबत फोटो शेअर करायचा. (Mansi Naik Husband Is Boxer and Model)आता त्याच्या अकाऊंटवरही मानसीचे फोटो दिसत नाही असे म्हणत काही नेटकऱ्यांनी ती विभक्त झाले का किंवा त्यांच्यात दुरावा आला का असा प्रश्न केला आहे. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते.