'मला जन्मच का दिला?' Amitabh Bachchan यांच्या मनात हा प्रश्न का घर करत होता?

Amitabh Bachchan यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला होता. दरम्यान, अमिताभ यांनी त्यांच्या वडिलांना विचारलेल्या प्रश्नानं हरिवंश राय बच्चन यांना धक्का बसला होता.  

Updated: Nov 28, 2022, 01:30 PM IST
'मला जन्मच का दिला?' Amitabh Bachchan यांच्या मनात हा प्रश्न का घर करत होता? title=

मुंबई : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सध्या 'कौन बनेगा करोडपती' या शोचे सुत्रसंचालन करत आहेत. शो दरम्यान, अमिताभ त्यांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. त्यांचे वडील कवी हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांची तर ते बऱ्याचवेळा आठवण काढतात. त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलेले धडे हे ते लक्षात ठेवून, ते स्पर्धक आणि प्रेक्षकांसोबत शेअर करतात. 

अमिताभ वडिलांची आठवण करत त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या तारुण्याच्या दिवसांची आठवण केली आहे. जून 2008 चा अमिताभ यांचा हा ब्लॉग सध्या पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या ब्लॉगमध्ये अमिताभ म्हणाले, 'एकदा त्यांनी वडिलांना विचारले होते की, तुम्ही आम्हाला का जन्म दिला? 

हेही वाचा : 'मन्नत से होकर गुजर रहा था...', म्हणत भर रस्त्यात बॉलिवूड अभिनेत्याचा Shahrukh Khan च्या घराबाहेर गोंधळ

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यात बिग बींनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याविषयी सांगितले. ते एका विशेष प्रकारच्या निराशेविषयी बोलताना म्हणाले की ही एक निराशा आहे ज्यामुळे भविष्यातील गोष्टींचा विचार केला तर खूप जास्त  दबाव येतो. पुढे स्वत: काय करायचं हे कळत नाही तेव्हा राग येतो. याच रागात अमिताभ हे एकदा वडिलांच्या खोलीत शिरले आणि त्यांची विचारपूस केली. ते आठवत म्हणाले, 'रागाने, हताश, खंबीर आणि अवास्तव विचारांनी भरलेल्या मी एका संध्याकाळी माझ्या वडिलांच्या स्टडी रुममध्ये गेलो आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेल्या त्या गुदमरलेल्या भावनांनी त्यांच्यावर ओरडलो आणि म्हणालो, तुम्ही मुलांना का जन्म दिला? तुम्ही आम्हाला जन्म का दिला? 

त्यांनी पुढे सांगितलं की, 'माझे वडील नेहमी प्रमाणेच लिखाणात मग्न होते आणि अचानक माझ्याकडे आश्चर्यानं पाहू लागले आणि नंतर तसेच बसून राहिले. ते काहीही बोलले नाही हे पाहून अमिताभ खोलीतून निघून गेले. त्यानंतर ते रात्रभर अस्वस्थ होते. 

वडिलांनी कसं दिलं उत्तर 

दुसऱ्या दिवशी अमिताभ यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या वडिलांनी कसे दिले हे सांगत म्हणाले, माझ्या वडिलांनी मला दुसऱ्या दिवशी उठवले आणि कविता लिहिलेलं एक कागद दिला. नई लीक ही कविता लिहत हरिवंश राय यांनी अमिताभ यांनी उत्तर दिलं. या कवितेचा अनुवाद केला आहे आणि त्यातले काही भाग लिहिले, 'माझी मुलं मला विचारतात- तू आम्हाला का जन्म दिलास? आणि माझ्याकडे उत्तर नाही की माझ्या वडिलांनी पण मला जन्म देण्यापूर्वी विचारले नाही. तसेच माझ्या वडिलांनी वडिलांना जन्म देण्यापूर्वी विचारले नाही किंवा माझ्या आजोबांनी त्यांना आणण्यापूर्वी त्यांच्या वडिलांना विचारले नाही. कवितेच्या शेवटी, त्याचे वडील त्यांना एक नवीन दिशा दाखवतात आणि ते जगाचा मार्ग कसा बदलू शकतो हे दाखवतो.

पुढे त्यांनी लिहिले की, 'तुम्ही एक नवीन सुरुवात, नवीन विचार का करत नाही, जन्म देण्यापूर्वी तुमच्या मुलांना विचारा.' अमिताभ यांनी शेवटी कवितेचा सारांश दिला आणि लिहिले, 'आयुष्यात कोणतीही सबब आणि दोष नसतात. प्रत्येक सकाळ हे एक नवीन आव्हान असते. एकतर तुम्ही आव्हान स्वीकारायला शिका आणि लढायला शिका किंवा तुम्ही त्याला शरण जायला शिका. तेव्हापर्यंत जीवन आहे, संघर्ष आहे!