निक जोनस देणार आपल्या लग्नात मित्रांना 'हे' गिफ्ट
निक जोनस देणार आपल्या लग्नात मित्रांना 'हे' गिफ्ट
पाहा काय आहे हे गिफ्ट
मुंबई : प्रियंका चोप्रा सध्या आपल्या अमेरिकन बॉयफ्रेंडसोबत लग्नामुळे चर्चेत आहे. प्रियंका चोप्रा आणि निक नोव्हेंबर महिन्यात जोधपुरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. जोधपुरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हा शाही सोहळा 2 डिसेंबरपर्यंत होणार आहे.
प्रियांका आणि निकच्या भारताता होणाऱ्या लग्नात केवळ दोघांचे कुटुंबीयच सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर या कपलने हा सोहळा खासगी राहिली याची पूर्ण काळजी घेतली आहे. या लग्नात बॉलिवूडचे कोणतेच कलाकार सहभागी होणार नाहीत. रिपोर्टनुसार निक आपल्या मित्रांना लग्नात एक कस्टमाइज लाइम स्कूटर देणार आहे. ज्याचा फोटो त्यांने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
प्रियांका आणि निकच्या लग्नातील फोटो हे एका आंतरराष्ट्रीय मासिकामध्ये छापण्यात येणार आहेत. ज्यासाठी जवळपास २५ लाख डॉलर इतकी घसघशीत रक्कम 'देसी गर्ल' आणि निकला मिळणार आहे. अद्यापही याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. किंबहुना त्या मासिकाचं नावही गुलदस्त्यातच आहे. पण, फोटो ज्या किमतीला विकले जाणार आहेत तो आकडा पाहून मात्र अनेकांच्या भुवया उंचावत आहेत हे खरं...
प्रियांका गेल्या काही वर्षांपासून परदेशातच जास्त वावरत असली तरीही तिचा विवाह सोहळा मात्र भारतात पार पडणार आहे. जोधपूरमधील उमेद भवन पॅलेस येथे राजेशाही थाटात ती आणि निक विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या विवाह सोहळ्याकडे लागून राहिल्या आहेत