... म्हणून वाढदिवसाच्या दिवशी अक्षय कुमार रडला
नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार आज आपला ५०वां वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात अक्षय कुमार रडताना दिसत आहे.
आपल्या वाढदिवसामुळे अभिनेता अक्षय कुमार सकाळपासूनच सोशल मीडियात ट्रेंड होत आहे. अक्षय कुमारवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाढदिवसाच्या दिवशीच अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात अक्षय रडताना दिसत आहे.
ट्विंकल खन्नाने आपला चांगला मित्र, आणि पती असलेल्या अक्षय कुमारचा व्हिडिओ शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विंकलने शेअर केलेल्या या व्हिडिओत त्यांची मुलगी अक्षय कुमारला वेगवेगळ्या परिस्थितीत चेहऱ्यांचे हावभाव करण्यास सांगत आहे. आधी त्याची मुलगी सांगते हॅप्पी फेस मग अक्षय स्माईल करतो. त्यानंतर लाफिंग फेस म्हटल्यावर अक्षय जोरजोराने हसतो. शेवटी क्राईंग फेस म्हटल्यावर अक्षय कुमार रडण्याची अॅक्टींग करतो.
Happy birthday to my best friend,kindest man in the world, a great dad with the best'dancey face'& jeez all that hotness on top of it all:) pic.twitter.com/uRIe2nEvU0
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) September 9, 2017
या व्हिडिओसोबतच ट्विंकलने एक ट्विटही केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ट्विंकल खन्ना म्हणते की, "माझ्या सर्वात चांगल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, जगातील सर्वात चांगला माणूस आणि एक महान पिता."
अभिनेता अक्षयचा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी झाला. अक्षयचं खरं नाव राजीव हरी ओम भाटिया असं आहे. अक्षयने १९९१मध्ये 'सौगंध' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
... म्हणून वाढदिवसाच्या दिवशी अक्षय कुमार रडला