नवी मुंबईत राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नवी मुंबईत राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत सर्व प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

Updated: Apr 7, 2015, 09:44 AM IST
नवी मुंबईत राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन title=

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत सर्व प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

नवी मुंबई महापालिकेसाठी शिवसेना भाजप युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षात प्रचंड नाराजी आहे. नाराज कार्यकर्ते बंडखोरीच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 

असं झाल्यास त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होईल. युतीची घोषणा झाल्यावर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अर्ज भरण्यास केंद्रावर आले. तर अनेक उमेदवार अजूनही एबी फॉर्मच्या प्रतिक्षेत आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.