Bank Holidays in January 2025: नव्या वर्षाची सुरुवात झाल्या दिवसापासून काही महत्त्वाचे बदल सामान्यांच्या जीवनावर परिणाम करताना दिसतील. प्रशासकीय निर्णय आणि काही आर्थिक धोरणांमुळं हे निर्णय लागू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अर्थात जानेवारी 2025 मध्ये संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या बँका 9 - 10 नव्हे, तर तब्बल 16 दिवस म्हणजेच जवळपास अर्धा महिना बंद राहणार आहेत.
राष्ट्रीय सुट्ट्या, स्थानिक बातम्या, सार्वजनिक सुट्ट्यांसह यात आठवडी सुट्ट्यांचाही समावेश असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून Bank Holidays ची एक यादी नुकतीच जारी करण्यात आली असून, राज्यनिहाय सुट्ट्यांची नोंद त्यामध्ये करण्यात आली आहे.
1 जानेवारी- नववर्ष/ देशातील बहुतांश राज्यात बँका बंद
5 जानेवारी- रविवार
11 जानेवारी- दुसरा शनिवार
12 जानेवारी- रविवार/ स्वामी विवेकानंद जयंती
14 जानेवारी- मकर संक्रांत/ पोंगल निमित्तानं आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणामध्ये बँका बंद
15 जानेवारी - तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू आणि संक्रांतीनिमित्त तामिळनाडू, आसाम आणि इतर राज्यांमध्ये बँका बंद
16 जानेवारी - उज्जावर तिरुनल/ तामिळनाडूतील बँका बंद
19 जानेवारी - रविवार / आठवडी सुट्टी
22 जानेवारी- इमोइन/ मणिपूरमध्ये बँकांना रजा
23 जानेवारी- नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती/ मणिपुर, ओडिशा, पंजाब, सिक्किम, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर आणि दिल्ली
25 जानेवारी- चौथा शनिवार
26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी - सोनम लोसर/ सिक्किममध्ये रजा