औरंगाबाद, नवी मुंबई पालिका निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या घटस्फोटानंतर भाजप-शिवसेनेचं सुत पुन्हा जुळले आहे.

Updated: Apr 7, 2015, 09:02 AM IST
औरंगाबाद, नवी मुंबई पालिका निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस title=

औरंगाबाद, नवी मुंबई : औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या घटस्फोटानंतर भाजप-शिवसेनेचं सुत पुन्हा जुळले आहे.

औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणूक भाजप-शिवसेना युती करून लढवणार आहे. तर या दोन्ही महापालिकांसाठी आघाडीत बिघाडी झालीय.. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर ही निवडणूक लढवणार आहेत.. नवी मुंबईत सोमवारी दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत सर्व प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

तर शिवसेना भाजप युती झाली असली तरी इच्छूक उमेदवार एबी फॉर्मसाठी ताटकळत आहेत. त्यामुळं अखेरच्या दिवशी अर्ज भरताना उमेदवारांची लगबग पाहायला मिळणार आहे.. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.