लहानपणी पैशांसाठी 'हा' स्टार कलाकार रस्त्यावर गायचा गाणं; तुम्ही Video पाहिला का?

Abdu Rozik Video Viral : स्टारच्या घरची परिस्थिती नाजूक असताना देखील त्यानं आज नाव कमवलंय. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून स्टार सर्वात छोटा गायक म्हणजेच...

Updated: Nov 8, 2022, 08:20 PM IST
लहानपणी पैशांसाठी 'हा' स्टार कलाकार रस्त्यावर गायचा गाणं; तुम्ही Video पाहिला का? title=
Abdu Rozik Childhood Video Viral

Abdu Rozik Childhood Video: गरिबी फार वाईट असते, असे शब्द अनेकदा आपल्या कानावर पडतात. अनेकांनी गरिबीतील दिवस पाहिले देखील असतील. अनेक कलाकार देखील शुन्यातून वर येतात. आपली कला सादर करत कलाकार लोकांच्या मनात घर करतात. अशाच एका स्टारच्या घरची परिस्थिती नाजूक असताना देखील त्यानं आज नाव कमवलंय. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून स्टार सर्वात छोटा गायक असलेला तजाकिस्तानचा अब्दू रोजिक (Abdu Rozik) आहे.

रोजिक 19 वर्षांचा आहे पण तो 6-7 वर्षांचा दिसतो. बालपणात ते ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेचा (abdu rozik age disease) बळी ठरला. त्यामुळे त्याची वाढ होऊ शकली नाही. त्याच्या या विचित्र आजारामुळे अनेकांना डोळ्यावर विश्वास बसत नाही. रोजिकचं लहानपण गरिबीत गेलं.

आणखी वाचा- 19 वर्षाचा Abdu Rozik ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा का दिसतो...

अब्दू रोजिकने त्याच्या आयुष्यात खूप संघर्ष केलाय. अब्दूचा बालपणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Abdu Rozik Childhood Video Viral) झाला आहे. ज्यामध्ये तो एक गाणं गाताना दिसतोय. ज्यासाठी लोक त्याला पैसे देत आहेत.  

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अब्दू बसून गाणं गाताना दिसतोय. यानंतर तो फळांच्या दुकानाबाहेर गाणं म्हणत आहे आणि लोक त्याला पैसे देत आहेत. अब्दू खूप गोंडस दिसतोय. त्याच्या संघर्षमय दिवसांचा हा व्हिडिओ आहे. मात्र, आता तो प्रसिद्धीच्या झोतात असल्याना त्याच्या संघर्षांचं कौतूक होताना दिसतंय.