कॅन्सरचा सामना करणार्‍या सोनालीला भेटून अक्षय कुमार म्हणाला...

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर ती कॅन्सरशी झगडत असल्याची पोस्ट केली. 

Updated: Jul 5, 2018, 03:20 PM IST
कॅन्सरचा सामना करणार्‍या सोनालीला भेटून अक्षय कुमार म्हणाला...  title=

मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सोशल मीडियावर ती कॅन्सरशी झगडत असल्याची पोस्ट केली. उपचारासाठी सोनाली सध्या अमेरिकेमध्ये आहे. दरम्यान निर्धाराने कॅन्सरचा सामना करत असल्याची एक हळवी पोस्ट सोनालीने शेअर केली आहे. त्यानंतर चाहत्यांसोबतच बॉलिवूडमधील सोनालीच्या सहकलाकारांनी तिच्या आरोग्यामध्ये लवकर सुधारणा व्हावी याकरिता प्रार्थना केली. 

अक्षय कुमारने घेतली सोनालीची भेट !  

सोनाली आणि अक्षय कुमारची भेट दोन दिवसांपूर्वी झाल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे. अक्षय कुमारने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनाली बेंद्रे ही एक फायटर आहे. लवकरच देव तिला पुन्हा चांगलं आरोग्य देईल. अशी आशा व्यक्त केली आहे.  पहा कॅन्सरशी सामना करत असलेली सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर काय म्हणाली

बॉलिवूडकरांच्या प्रार्थना 

अक्षय कुमारप्रमाणेच बॉलिवूडमधील इतर कलाकारांनीदेखील सोनालीच्या आरोग्याबाबत प्रार्थना केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या प्रार्थना शेअर केल्या आहेत. 

 

सोनाली करतेय 'हाय ग्रेड कॅन्सर'शी सामाना  

सोनाली सध्या 'हाय ग्रेड कॅन्सर'चा सामना करत असल्याचेऐ माहिती तिने एका सोशल मीडिया पोस्टमधून शेअर केली आहे. सोनालीसोबत तिच्या कुटुंबीयांचा आणि मित्रपरिवाराचा पाठिंबा असल्याचे तिने पोस्टमध्ये लिहले आहे. सोनाली बेंंद्रे सामना करत असलेला High Grade Cancer म्हणजे नेमके काय ?