लेकीच्या जन्मापासून Alia करतेय 'हे' काम, Photo शेअर करत म्हणाली... "बहूतेक 6 नोव्हेंबरपासून मी...''

Alia Bhatt Shares Ranbir Kapoor Photo with Raha Kapoor: आई झाल्यानंतरही आलिया भट्टही आपल्या जबाबदारी पुर्णपणे पुर्ण करताना (Raha Kapoor Latest Photo) दिसत आहे. त्याचसोबत आपल्या लेकीसह ती वेळ घालवते आहे, नुकताच तिनं आपल्या लेकीचा आणि रणबीरचा फोटो इन्टाग्रामवर (Alia Bhatt Instagram) शेअर केला आहे. 

Updated: Apr 24, 2023, 07:14 PM IST
लेकीच्या जन्मापासून Alia करतेय 'हे' काम, Photo शेअर करत म्हणाली... "बहूतेक 6 नोव्हेंबरपासून मी...'' title=
फोटो - आलिया भट्ट / इन्टाग्राम

Alia Bhatt Shares Ranbir Kapoor Photo with Raha Kapoor: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाला या वर्षी 14 एप्रिलला एक वर्ष पुर्ण झालं त्यानिमित्तानं (Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding Anniversary) आलियानंही इन्टाग्रामवरून त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो शेअर केले होते. नीतू कपूर यांच्यासह कपूर कुटुंबियांनीही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छ दिल्या होत्या. रणबीर आपल्या 'एनिमल' या चित्रपटासाठी शूटिंग करतो आहे तर आलियाही आपल्या कामात व्यस्त होती परंतु आता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपल्या लेकीसह (Alia Bhatt Daughter) एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत.

आलियाच्या वाढदिवसानंतर ते आपल्याला कामात व्यस्त असलेले पाहायला मिळाले परंतु आता त्यांच्या निवांत क्षणाचा साक्ष देणारा एक फोटो व्हायरल (Alia Bhatt Raha Kapoor Photo) झाला आहे जो स्वत: आलियानं इन्टाग्रामवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणबीर राहाच्या शेजारी बसला आहे आणि आपल्या लेकीला न्याहाळताना दिसतो आहे. सध्या हा फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. आतापर्यंत या फोटोला तासाभरात 6 लाख लाईक्स मिळाले आहेत. आलियानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की राहाच्या जन्मापासून म्हणजे 6 नोव्हेंबरपासून मी एक चांगली फॉटोग्राफर बनले आहे, असं ती म्हणते. 

सध्या या फोटोवर चाहते भन्नाट कमेंट्स देताना दिसत आहेत. हा फोटो ब्लॅक एन्ड व्हाईटमध्ये (Raha Kapoor Latest Photo) असल्या कारणानं या फोटोचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते आहे. राहा कपूर आता म्हणता म्हणता 6 महिन्यांची होईल. मध्यंतरी तिचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. आलियानं अजूनपर्यंत तरी राहाचे फोटो रिविल केलेले नाहीत. त्यामुळे चाहत्यांनीही राहाचा एखादा तरी फोटो पाहण्याची उत्सुकता निर्माण झालेली आहे. राहाचे मध्यंतरी काही फोटोज लिक झालेले ज्यावर आलिया भट्टनं फोटो व्हायरल करणाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली होती. या फोटोतही आलियानं राहाचा चेहरा दाखवलेला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया भट्ट लवकरच तिच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलियासोबत तिचा आवडता को-एक्टर रणवीर सिंगही असणार आहे. तर रणबीर कपूरचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट रिलिज झाला होता. ज्याला बॉक्स ऑफिसवर तूफान प्रतिसाद मिळाला आहे. आता त्याचा 'एनिमल' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे ज्याचा पोस्टर काही दिवसांपुर्वी रिलिज झाला होता. आलिया आणि रणबीर एकत्र आलियाच्या 30 व्या वाढदिवशी एकत्र दिसले होते.