'भाभीजी'नं ओलांडली साधेपणाची वेस; बोल्ड VIDEO पाहणाऱ्यांना धक्का

हम का कह रहै हे... लड्डू के भय्या.... असं म्हणत ती समोर आली, की चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकलाच म्हणून समजा.   

Updated: Apr 5, 2022, 08:49 PM IST
'भाभीजी'नं ओलांडली साधेपणाची वेस; बोल्ड VIDEO पाहणाऱ्यांना धक्का  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : विनोदी कथानक आणि तितकीच विनोदी पात्र असणारी (Bhabhi Ji Ghar Par Hai) 'भाभीजी घर पर है...' ही मालिका प्रेक्षकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी होती. या मालिकेमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदे हिनं अंगूरी भाभी हे पात्र साकारलं होतं. 

'हम का कह रहै हे... लड्डू के भय्या....' असं म्हणत ती समोर आली, की चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकलाच म्हणून समजा. 

'भाभीजी...'च्या निमित्तानं अतिशय सोज्वळ भूमिकेत झळकलेली ही शिल्पा आता कधीही न पाहिलेल्या बोल्ड रुपात सर्वांसमोर आली आहे. निमित्त आहे, तिच्या नव्या वेब सीरिजचं. 

'पौरुषपुर' असं तिच्या या आगामी सीरिजचं नाव. यामध्ये शिल्पानं बरेच बोल्ड सीन साकारले आहेत. राणी मीराबती हिच्या भूमिकेत शिल्पानं स्वत:ला एकरुप केल्याचं या सीरिजमध्ये दिसून येतं. 

'मीराबती' ही तिच्या राजाची काळजी घेण्यासाठी नव्या राण्या आणते असं एकंदर कथानक या सीरिजमध्ये साकारलं गेलं आहे. 

एरव्ही सोज्वळ आणि काहीही कळत नाही अशा अविर्भावातील अंगुरी भाभीच्या रुपात येणारी अंगूरी इतकी बोल्डही असू शकते यावर अनेकांचाच विश्वास बसत नाहीये. पण, सीरिजचा टीझरच तिचं इतकं बोल्ड रुप दाखवतोय की पूर्ण सीरिजमध्ये काय असेल याचंच कुतूहल सीरिज न पाहिलेल्यांनी व्यक्त केलं आहे.