‘मुक्काबाज’ चा ट्रेलर रिलीज, रोमान्स, अ‍ॅक्शन, बॉक्सिंगचा तडका

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या बहुचर्चीत ‘मुक्काबाज’ या सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या सिनेमातून जातीवाद आणि त्यासोबतच भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. उत्तरप्रदेशच्या पार्श्वभूमीवर ही कथा दाखवण्यात आली आहे. 

Updated: Dec 7, 2017, 10:10 PM IST
‘मुक्काबाज’ चा ट्रेलर रिलीज, रोमान्स, अ‍ॅक्शन, बॉक्सिंगचा तडका

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या बहुचर्चीत ‘मुक्काबाज’ या सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या सिनेमातून जातीवाद आणि त्यासोबतच भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. उत्तरप्रदेशच्या पार्श्वभूमीवर ही कथा दाखवण्यात आली आहे. 

या सिनेमातून हे स्पष्ट दिसतं की, ही कथा श्रवण सिंह नावाच्या बॉक्सरची आहे. जो स्थानिक डॉन जिमी शेरगिलच्या जिममध्ये बॉक्सिंग शिकतो. दरम्यान, त्याला शेरगिलच्या भाजीसोबत प्रेम होतं. 

सिनेमात दाखवण्यात आलं आहे की, बॉक्सर कोणत्या समाजातून येतो, समाजात बॉक्सिंगची काय स्थिती आहे. या सिनेमात विनीत कुमार, जिम्मी शेरगिल, रवि किशन यांच्यासारखे कसदार अभिनेते दमदार अभिनय करताना दिसणार आहेत. येत्या १२ जानेवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.