अमेरिकेच्या रस्त्यावर 'बहरला हा मधुमास', अभिनेत्याने केला आईसह डान्स, तुम्ही पाहिला का Video?

Baharla Madhumas Dance Viral Video: 'ठरलं तर मग' या मालिकेतून घरोघरी पोहोचलेला मराठी अभिनेता अपूर्व रांजणकर (Apoorva ranjankar) याने एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे.

Updated: May 28, 2023, 04:57 PM IST
अमेरिकेच्या रस्त्यावर 'बहरला हा मधुमास', अभिनेत्याने केला आईसह डान्स, तुम्ही पाहिला का Video? title=
Apoorva ranjankar viral dance video

Baharala Madhumas Viral Dance Video: गेल्या तीन आठवड्यापासून महाराष्ट्रात सर्वांना वेड लागलंय ते 'बहरला हा मधुमास' या गाण्याचं. सध्या सर्वत्र महाराष्ट्र शाहीर (Maharastra Shahir) या सिनेमाची चर्चा आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत या चित्रपटाला अनेकांनी डोक्यावर घेतलं. संगित दिग्दर्शक अजय अतुल यांच्या अप्रतिम आवाजामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राच्या ओठी शाहीर साबळे यांची गाणी आहेत. महाराष्ट्र शाहीर सिनेमाला यश तर मिळालंच तसेच चित्रपटातील गाण्यांनाही (Maharastra Shahir Songs) प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अशातच आता सातासमुद्रापार हे गाणं धुमाकूळ घातलाना दिसतंय.

'बहरला हा मधुमास' गाण्यावरील (Baharala ha Madhumas) रील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले. अनेक अभिनेत्रींनी यावर डान्स करत व्हिडिओ शेअर केला आहे. अशातच आता अमेरिकेच्या रस्त्यांवर मराठमोळ्या गाण्याची क्रेझ पहायला मिळत आहे. अशातच 'ठरलं तर मग' या मालिकेतून घरोघरी पोहोचलेला मराठी अभिनेता अपूर्व रांजणकर (Apoorva ranjankar) याने एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे.

आणखी वाचा - Maharashtra Shahir: अंगावर रोमांच, डोळे भरून आले; अमृता खानविलकर म्हणते "मला अंकुश दिसलाच नाही"

अभिनेता अपूर्व रांजणकरनेही 'बहरला हा मधुमास' या गाण्यावर आईसह रील बनवला आहे. इथं तिथं नव्हे तर थेट अमेरिकेत. अपूर्व रांजणकर याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो आईसह अमेरिकेत (America street Dance Video) फिरताना दिसतोय. त्यावेळी त्याने या मराठमोळ्या गाण्यावर सर्वांसमोर डान्स केला. इम्स स्क्वेअरच्या (E-Square) मिडलमध्ये त्याने हा डान्स केलाय. ही गोष्ट माझ्या बकेट लिस्टमध्ये होती, असं त्याने पोस्ट करताना म्हटलंय.

पाहा Video

दरम्यान, सना शिंदे आणि अंकुश चौधरी यांचं हे गाणं सध्या जगाच्या चारही कोपऱ्यात व्हायरल होत आहे. काही दिवसापूर्वी तांजानियाच्या किली पॉल आणि त्याच्या बहिणीने बहरला हा मधुमास या गाण्यावर रील व्हिडीओ केला होता. त्यांचा हा व्हिडिओ अंकुश चौधरी, सना शिंदे, केदार शिंदे यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. या गाण्यावर अनेकांना लिप्सिंग करणं जमत नाही. मात्र, आता अनेकांनी यावर रील देखील तयार केले आहेत.