Maharashtra Shahir: अंगावर रोमांच, डोळे भरून आले; अमृता खानविलकर म्हणते "मला अंकुश दिसलाच नाही"

Amrita Khanwilkar On Ankush Choudhari: मराठमोळी धकधक गर्ल अमृता खानविलकरने (Amrita Khanwilkar) महाराष्ट्र शाहीर (Maharastra Shaheer) सिनेमावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.  यावेळी तिने अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhari) यांचं तोंडभरून कौतूक केलंय. 

सौरभ तळेकर | Updated: May 3, 2023, 10:34 PM IST
Maharashtra Shahir: अंगावर रोमांच, डोळे भरून आले; अमृता खानविलकर म्हणते "मला अंकुश दिसलाच नाही" title=
Amrita Khanwilkar,Maharastra Shahir

Amrita Khanwilkar On Maharastra Shahir: महाराष्ट्राचे गायक शाहीर साबळे म्हणजेच कृष्णराव गणपतराव साबळे (Krishnarao Ganpatrao Sable) यांच्या आयुष्यावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' (Maharastra Shahir) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मराठी प्रेक्षक महाराष्ट्र दिनी संतुष्ट झाले ते शाहीर साबळे यांच्या 'गर्जा महाराष्ट्र माझा' या गाण्याने.. स्टार अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhari) याच्या अफलातून अभिनयाच्या जोरावर 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. खऱ्या अर्थाने महान कलावंताची ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यात दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यशस्वी ठरलेत, हे नक्की.. याच सिनेमावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

कलाक्षेत्रातून या सिनेमावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. सिनेमा म्हणजे लाखात एक. अशातच मराठमोळी धकधक गर्ल अमृता खानविलकरने महाराष्ट्र शाहीर सिनेमावर (Amrita Khanwilkar On Maharastra Shahir) आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाली अमृता खानविलकर?

आजच्या दिवशी जर आपल्या जन्मभूमीला, कर्म भूमीला तुम्हाला बहुमान द्याचा असेल तर फक्त महाराष्ट्र शाहीर अनुभवून बघा. प्रेक्षक म्हणून हा चित्रपट बघताना डोळे भरून येतात, अंगावर रोमांच उभे राहतात, उर अभिमानाने भरून येतो, असं अमृता म्हणते.

उत्तम दिग्दर्शन,छायाचित्रण आणि अभिनयाने नटलेला हा चित्रपट तुम्ही बघायलाच पाहिजे. केदार शिंदे अप्रतिम स्टोरी टेलिंग अप्रतिम होती. दिग्दर्शन अंकुश चौधरी मला कुठंच दिसत नाही, फक्त आणि फक्त शाहीर साबळे, असं म्हणत अमृताने अंकुशच्या अभिनयाचं (Amrita Khanwilkar On Ankush Choudhari) कौतूक केलं आहे.

पाहा Post

दरम्यान, सना शिंदेचे डोळे, तिची सरलता आणि चित्रपटातील तिची स्थिरता खूपच जीवघेणी आहे आणि अजय-अतुल यांच्या संगिताबद्दल जितकं बोलावं तितकं कमी, गाऊ नको किसना म्हणजे कमाल, पाऊल थकलं नाही, असंही ती म्हणते. अजय सर काय ओ बोलावं नतमस्तक, चित्रपट नक्की बघा, जय जय महाराष्ट्र माझा, असं अमृता खानविलकरने पोस्ट करत म्हटलं आहे.