किंग खान लवकरच खलनायकाच्या भूमिकेत?

हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. 

Updated: Apr 24, 2019, 03:45 PM IST
किंग खान लवकरच खलनायकाच्या भूमिकेत?  title=
शाहरुख खान

मुंबई : अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या कलाविश्वातील कारकिर्दीमुळे नेहमीच प्रकाशझोतात असतो. शाहरुखचा अंदाज आणि त्याची एकंदर लोकप्रियता पाहता फक्त हिंदी भाषिक प्रेक्षक किंवा बॉलिवूडप्रेमींमध्येच नव्हे तर, दाक्षिणात्य कलाविश्वातही त्याचं वेड पाहायला मिळतं. असा हा किंग खान येत्या काळात एका तमिळ चित्रपटातून झळकणार असल्याची चर्चा आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात तो नकारात्मक अर्थात खलनायकी भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. 

अभिनेता विजयची भूमिका असणाऱ्या Thalapathy 63 'तालापथी ६३' या चित्रपटात शाहरुखला ही भूमिका दिली असल्याचं म्हटलं जात आहे. त्याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, जर हे वृत्त खरं असेल तर शाहरुखचा तमिळ चित्रपटसृष्टीत हा दुसरा चित्रपट असेल. यापूर्वी त्याने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हे राम' या चित्रपटातून तो झळकला होता. 

'फिल्मफेअर'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 'या चित्रपटात शाहरुखची एक महत्त्वाची भूमिका असेल. विजयशी लढतानाच्या दृश्यात तो झळकणार असून, निर्माते आणि दिग्दर्शकांना हिंदी कलाविश्वातील एक प्रसिद्ध चेहरा हवा होता. त्यातही जेव्हा एटली कुमारने शाहरुखकडे याविषयीची विचारणा केली तेव्हा त्याच्याकडून काही अंशी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. चेन्नईत त्याच्या या भूमिकेसाठी चार ते पाच दिवसांच्या चित्रीकरणाचा बेत आखण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

कलाविश्वात रंगणारं हे वृत्त आता कितपत खरं आहे, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. काही दिवसांपूर्वीच एमए चिदंबरम स्टेडियममध्ये शाहरुख आणि एटली कुमार यांना एकत्र पाहिलं गेलं होतं. तेव्हा सोशल मीडियावरही याविषयीच्या अनेक चर्चांनी जोर धरला. ज्यानंतर आता तमिळ चित्रपटविश्वातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.