'तालिबानी त्यावेळी असं काही करती हे स्वप्नातही वाटलं नव्हतं', प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकानं सांगितला तो थऱारक अनुभव

दहशतवाद्याचे हे शब्द ऐकून पायाखालची जमीन सरकलेली... 

Updated: Aug 20, 2021, 08:55 PM IST
'तालिबानी त्यावेळी असं काही करती हे स्वप्नातही वाटलं नव्हतं', प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकानं सांगितला तो थऱारक अनुभव title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : अफगाणिस्तानमध्ये सध्या बरीच उलथापालथ सुरु आहे. तालिबाननं या देशात वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर सर्वत्र नकारात्मकतेची लाट पाहायला मिळाली. ज्यानंतर अनेकांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. एका मुलाखतीमध्ये चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यानंही तालिबानसोबतचा त्याचा अनुभव सर्वांशी शेअर केला. 

माध्यमांशी संवाद साधताना कबीरनं हा रक्त गोठवणारा अनुभव सांगत आपल्याला तो अनुभव आठवूनही धडकी भरते असं सांगितलं. तालिबानी नेमके काय म्हणालेले हे सांगत तो म्हणाला, 'मला लघुपटाच्या वेळचा एक अनुभव आठवतो. ज्यावेळी मी 9/11 च्या घटनेनंतर 2001 मध्ये तालिबानच्या कोणा एका सदस्याशी संवाद साधला होता. त्यावेळी तालिबानमधील एका दहशतवाद्यानं थेट माझ्या कॅमेरामध्ये एक कटाक्ष टाकला होता. कॅमेऱ्यात पाहत तो म्हणालेला तुम्हाला वाटतंय आम्ही संपलोय, पण आम्ही परत येऊ.....'

दहशतवाद्याचे हे शब्द ऐकून कबीरचं रक्त गोठलं होतं. आजही तो जेव्हा तो क्षण आठवतो, तेव्हा त्याच्या मनात धडकी भरते. अफगाणिस्तानमध्ये तब्बल 20 वर्षांनंतर तालिबानचं अशा पद्धतीनं पुनरागमन होणं ही बाब अतिशय धक्कादायक आहे, असं म्हणत कबीरनं सध्याच्या वास्तवावर आपली प्रतिक्रिया दिली. 

देश सोडू इच्छित लोकांना तालिबानकडून दिली जातेय ही क्रूर शिक्षा

Kabir Khan recalls spine-chilling interview with Taliban member, says 'he looked straight into the camera and said..'

'काबुल एक्सप्रेस'साठी ओळखला जातो कबीर  
दिग्दर्शक कबीर खान हा त्याच्या 'काबुल एक्सप्रेस' या चित्रपटासाठी ओळखला जातो. या चित्रपटाव्यतिरिक्त त्यानं Taliban years and Beyond, The Titanic Sinks in Kabul या लघुपटांसाठीही अफगाणिस्तानातून काम करत तेथील चित्र जगासमोर आणलं होतं. तालिबान आणि अफगाणिस्तानप्रती त्याचा ओढा अशा कलाकृतींच्या निर्मितीसाठी त्याला प्रेरणा देऊन गेला.