देश सोडू इच्छित लोकांना तालिबानकडून दिली जातेय ही क्रूर शिक्षा

तालिबान्यांचा खरा चेहरा येतोय जगासमोर

Updated: Aug 20, 2021, 08:35 PM IST
देश सोडू इच्छित लोकांना तालिबानकडून दिली जातेय ही क्रूर शिक्षा title=

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून तेथील परिस्थिती बिकट आहे आणि दहशतवादी संघटनेची भीती असलेले लोक कोणत्याही किंमतीत देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तालिबान्यांना हे पसंत पडलेलं नाही आणि ते अशा लोकांना आणि कुटुंबांना लाठ्यांनी मारहाण करत आहेत. असा दावा एका मानवाधिकार गटाने केला आहे.

अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर येताच तालिबान क्रूरतेवर उतरल्याचा दावा अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने आपल्या अहवालात केला आहे. जे लोक आणि कुटुंबे त्यांच्या भीतीने देश सोडू इच्छितात त्यांना तालिबानकडून क्रूर शिक्षा आणि अत्याचार केले जात आहेत. तालिबानी अशा लोकांना लाठ्या काठ्यांनी मारत आहेत.

तालिबान्यांनी हजारा अल्पसंख्याक गटातील लोकांवर अत्याचार केले आणि अनेकांना ठार मारल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे की, त्यांना गझनी प्रांतातील क्रूर हत्येतील साक्षीदारांनी या घटनेबद्दल भयानक माहिती दिली होती.

मलिस्तान जिल्ह्यात 4 ते 6 जुलै दरम्यान तालिबानी लोकांनी सुमारे नऊ हजार लोकांना ठार मारले, कारण सत्ता ताब्यात घेण्यापूर्वी सरकार आणि तालिबान यांच्यात लढाई तीव्र झाल्याने गावकरी डोंगरावर पळून गेले होते. 

अहवालानुसार, जेव्हा वाचलेले लोक त्यांच्या गावाकडे परतले, तेव्हा त्यांच्या घरांची तोडफोड केल्यानंतर तालिबानी त्यांची वाट पाहत असल्याचे आढळले. ते तिथे पोहोचताच तालिबानी दहशतवाद्यांनी सहा जणांना गोळ्या घातल्या. यातील काही लोकांच्या डोक्यात गोळी लागली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, एका माणसाचा तालिबान्यांनी स्वतःच्या स्कार्फने गळा दाबला आणि नंतर त्याच्या हाताचे स्नायू कापले, तर दुसऱ्याच्या शरीराचे तुकडे केले.

एक दिवसापूर्वी प्रकाशित झालेल्या अॅम्नेस्टीच्या अहवालात म्हटले आहे की, अलीकडच्या काळात दहशतवादी गटाने आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आहे आणि या घटना तालिबान राजवटीचे "भयानक चित्र" दाखवत आहे.