Gadar 2 Box Office Collection Day 3: बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा 'गदर'; तिसऱ्या दिवशीच्या कमाईनं मोडले रेकॉर्ड

Gadar 2 Box Office Collection Day 3 : 'गदर 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकामागे एक असे अनेक रेकॉर्ड मोडले आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई पाहता अनेकांना आश्चर्य झाले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 14, 2023, 08:08 AM IST
Gadar 2 Box Office Collection Day 3: बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा 'गदर'; तिसऱ्या दिवशीच्या कमाईनं मोडले रेकॉर्ड title=
(Photo Credit : Social Media)

Gadar 2 Box Office Collection Day 3 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट 'गदर' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. तरी सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटानं तीन दिवसात इतकी कमाई केली की 'गदर: एक प्रेम कथा' नं वर्ल्डवाइड कमाई केली होती. 

सनी देओलचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरा उतरला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा चित्रपट खरंच बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. पठाणनंतर बॉलिवूडचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकला नाही. तेच सनी देओलच्या चित्रपटानं करून दाखवलं आहे. चित्रपटाच्या ऑक्यूपेंसी विषयी बोलायचं झाले तर रविवारी ऑक्युपेंसी ही 83.82% होती. सकाळच्या शोमध्ये ही ऑक्युपेंसी 65.00% होती. तर दुपारच्या शोमध्ये 90.44% होती. संध्याकाळी हा आकडा वाढला असून ही 96.02% इतकी झाली. तर मुंबईत तिसऱ्या दिवशी 78.67% इतकी ऑक्यूपेंसी होती तर दिल्ली एनसीआरमध्ये 93.67% ऑक्यूपेंसी होती. तर चेन्नईमध्ये 100% होती. 

काल म्हणजे रविवारी चित्रपटानं 49.50 ते 51.50 कोटींची कमाई केली. बॉलिवूड हंगामानं दिलेल्या रिपोर्टनुसार चित्रपटाच्या कमाईत तिसऱ्या दिवशी 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटानं 40.10 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 43 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी कमाईचा आकडा वाढत 51 कोटींची झाली. दरम्यान, सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटानं शाहरुखच्या पठाण चित्रपटाला मागे टाकलं आहे.  शाहरुखच्या पठाण या चित्रपटानं तिसऱ्या दिवशी 39 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे गदरच्या तीन दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर भारतात चित्रपटानं 134 कोटींची कमाई केली आहे. 

'गदर 2' च्या कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर इतर अनेक चित्रपटाच्या तुलनेत चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. या चित्रपटानं 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' या दोन्ही चित्रपटांना कलेक्शनमध्ये मागे टाकलं आहे. 'बाहुबली' चित्रपटानं तीन दिवसांत हिंदीत 22.35 कोटींची कमाई केली होती. तर 'बाहुबली 2' हिंदी चित्रपटानं तीन दिवसांत 74.4 कोटींची कमाई केली होती. 

हेही वाचा : स्वानंदीनंतर आता 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेता पुष्कराज अडकणार लग्न बंधनात?

'गदर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचं नेट कलेक्शन हे 83.18 कोटी रुपये होतं. तर ग्रॉस कलेक्शन हे 98.20 आहे. चित्रपटानं वर्ल्ड वाइट कलेक्शनमध्ये 100 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटानं 108.20 कोटींची कमाई केली. असं म्हटलं जातं की सनी देओलचा हा चित्रपट त्याच्या करिअरमधला सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. दुसरीकडे सनी देओलच्या 'गदर' विषयी बोलायचे झाले तर त्या चित्रपटानं तीन दिवसात 1.60 कोटींची कमाई केली होती. ओपनिंग डेला ही कमाई 1.35 कोटींची होती तर दुसऱ्या दिवशी 1.27 कोटी झाली. चित्रपटानं एकूण 76.65 कोटींची कमाई केली होती. तर जगभरात 132.60 कोटींची कमाई केली. तर लाइफटाइम इंडियाच्या ग्रॉस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर चित्रपटानं 127.20 कोटींची कमाई केली आहे.