रॅम्पवॉकवर प्रसिद्ध अभिनेत्री झाली Oops मोमेंट'ची शिकार, स्कर्ट फाटला आणि घडलं असं काही....

अभिनेत्री गौहर खान आजकाल आपल्या पतीसोबत क्वालिटी टाईम स्पेंन्ड करत आहे.

Updated: Jul 5, 2021, 06:33 PM IST
 रॅम्पवॉकवर प्रसिद्ध अभिनेत्री झाली Oops मोमेंट'ची शिकार, स्कर्ट फाटला आणि घडलं असं काही.... title=

मुंबई : अभिनेत्री गौहर खान आजकाल आपल्या पतीसोबत क्वालिटी टाईम स्पेंन्ड करत आहे. सध्या ती मॉस्कोला आहे आणि तिथले सुंदर फोटो शेअर करत आहे. गौहर खान सध्या अभिनय दुनियेपासून दूर आहे पण ती एक यशस्वी मॉडेल ठरली आहे आणि मॉडेलिंग दरम्यान तिच्यासोबत असंही काही घडलं ज्यामुळे ती लाजेने लाल झाली.

गौहरचा थ्रोबॅक व्हिडिओ
गौहर खान हे मॉडेलिंग क्षेत्रात एक प्रसिद्ध नाव आहे. मोठ्या डिझायनर्सच्या फॅशन शोमध्ये रॅम्प करताना ती नेहमीच पाहायला मिळते. पण एकदा तिला एक रॅम्पवॉक महागात पडला होता बऱ्याच वर्षांपूर्वी अभिनेत्री लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर आली होती. यादरम्यान तिने गोल्डन टॉप आणि ब्लॅक स्कर्ट घातला होता.

फाटला होता स्कर्ट
गौहर खान वॉक करत पुढे जात असताना तिच्या स्कर्टचे टाके मागून उघडत होते. गौहरला समजलं की, काहीतरी चूकीचं घडत आहे. जेव्हा तिने आपल्या स्कर्टला मागच्या बाजूने स्पर्श करुन चेक केलं तेव्हा तिला समजलं की, तिचा स्कर्ट मागून फाटला आहे. मात्र, गौहर अजिबात दचकली नाही. अत्यंत हुशारीने तिने त्या परिस्थितीत स्वत:ला शांत ठेवलं आणि रॅम्पवॉक पूर्ण केला.

गौहरचं वर्कफ्रंट
गौहरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, गौहर खान 'बिग बॉस 14' चा एक भाग होती.. याशिवाय तिने सैफ अली खानच्या 'तांडव' या वेबसिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली होती.