ट्रोलर्सला प्रत्यूत्तर देताना केतकी म्हणतेय '...असा महाराष्ट्र माझा नाही'

केतकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसतोय

Updated: Jun 14, 2019, 04:31 PM IST
ट्रोलर्सला प्रत्यूत्तर देताना केतकी म्हणतेय '...असा महाराष्ट्र माझा नाही' title=

मुंबई : 'तुझं माझं ब्रेकअप' या कार्यक्रमातून घराघरांत पोहचलेली छोट्या पडद्यावरची अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आलीय. यावेळी, केतकी चर्चेत आलीय ती सोशल मीडियावर तिनं शेअर केलेल्या काही व्हिडिओमुळे... काही दिवसांपूर्वी केतकीनं सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिनं मराठीतून नाही तर हिंदीमधून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी तिनं हिंदी ही आपली 'राष्ट्रभाषा' आहे असं म्हटलं होतं. मात्र, केतकीच्या या व्हिडिओवर ट्रोलर्सकडून अनेक खालच्या दर्जाच्या प्रतिक्रिया आल्या. यावर उद्विग्न होत केतकीनं आणखी एक व्हिडिओ शेअर करत ट्रोलर्सचा मराठीचा 'क्लास'चं घेतलाय. 

केतकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसतोय. ट्रोलर्सला प्रत्युत्तर देताना केतकीनं 'तुमची मराठी संस्कृती इतकी तकलादू आहे का?' असा प्रश्नही केतकीनं यावेळी विचारलाय. 'माझी मातृ आणि पितृ भाषा इतकी कमकुवत नाही की एका व्हिडिओत मराठीत बोललं नाही, जाहीरपणे प्रेम सादर केलं नाही तर ती मोडकळीला लागेल' असं म्हणत तिनं आपला रागही शेलक्या शब्दांतून व्यक्त केलाय. 

काही दिवसांपूर्वी केतकी हिने तिच्या 'लक्ष्मी सदैव मंगलम' या कार्यक्रमाच्या निर्मात्यावर केलेल्या आरोपांमुळेही ती चर्चेत आली होती. केतकीला एपिलेप्सी (फीट) चा त्रास आहे. त्यामुळेच आपली या मालिकेतून हकालपट्टी झाल्याचं तिनं म्हटलं होतं. यानंतर तिनं सोशल मीडियावर 'एपिलेप्सी' संदर्भात जनजागृती करणारे काही व्हिडिओही शेअर केले आहेत. एखाद्या व्यक्तीला फीट येताना दिसली तर काय कराल? एपिलेप्सी संदर्भात काय गैरसमज आहेत? तुमच्या घरी कुणाला एपिलेप्सी असल्यास, तुम्ही काय करू शकता? असे अनेक व्हिडिओ केतकीनं सोशल मीडियातून तिच्या चाहत्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.