Oscar : प्रियंकाच्या योग्यतेवर पत्रकाराचा प्रश्न, दिलं सडेतोड उत्तर

प्रियंकाच्या करिअरवर प्रश्नचिन्ह

Updated: Mar 18, 2021, 11:45 AM IST
Oscar : प्रियंकाच्या योग्यतेवर पत्रकाराचा प्रश्न, दिलं सडेतोड उत्तर  title=

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) जोनसने (Nick Jonas) नुकतंच निक जोनससोबत 93 व्या ऑस्कर ऍकडमी अवॉर्ड्सच्या नॉमिनेशनची घोषणा केली. यावर प्रियंकाच्या मित्रपरिवाराने आणि चाहत्यांनी एक सुवर्णसंधी म्हणून पाहिलं होतं. यावरून प्रियंका चोप्राचं सोशल मीडियावर खूप कौतुक झालं. (Journalist Who Asked Priyanka Why She Was Announcing Oscar Noms) मात्र एका परदेशी पत्रकाराकडून ऑस्कर नॉमिनेशन्सकरता प्रियंकाच्या योग्यतेवर प्रश्न विचारण्यात आला. पत्रकाराच्या या प्रश्नावर प्रियंका चोप्राने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

पत्रकाराचा प्रियंका-नीकला प्रश्न

परदेशी पत्रकार पीटर फोऱ्डने ट्विटर हँडलवर एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये प्रियंका-निकचा ऑस्कर अवॉर्ड नॉमिनेशननंतरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की,'या दोघांप्रती काही सन्मान नाही असं नाही, मात्र या दोघांचं सिनेमात योगदान एवढं नाही की, त्यांना ऑस्कर नॉमिनेशनच्या घोषणेची संधी मिळावी.'

प्रियंका चोप्राने दिलं सडेतोड उत्तर 

अभिनेत्री प्रियंका चोप्राने पत्रकाराला ट्विटवर सडेतोड उत्तर दिलं आहे. 'कुणी क्वालीफाय कसं असू शकतं? यावर तुमचे विचार जाणू इच्छिते. तुमच्या माहितीसाठी माझ्या नावे 60हून अधिक सिनेमांच्या नावांची नोंद आहे.' या ट्विटसोबत प्रियंकाने आपल्या पूर्ण सिनेमाची लिस्ट जोडली आहे. प्रियंकाने हे सडेतोड उत्तर दिल्यावर पत्रकाराने आपलं ट्विट डिलीट केलं. 

यावर लेखक अपूर्व असरानीने पीटरच्या ट्विटवर आश्चर्यव्यक्त करत लिहिलं.'क्वालीफाय? प्रियंका चोप्राने आतापर्यंत 80 सिनेमांत काम केलं आहे. ज्यामध्ये 13 सिनेमांची तिच निर्माती आहे. प्रियंकाचा या आधीचा सिनेमा बाफ्टा आणि ऑस्करसाठी नॉमिनेट झालं आहे. टाइम्सची 100 सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये आणि फोर्ब्सच्या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत प्रियंकाचा समावेश आहे. तसेच ममोइर न्यूयॉर्कच्या बेस्ट सेलरमध्ये देखील आहे. '