डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्यानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट

आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

Updated: Dec 1, 2020, 05:33 PM IST
डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्यानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट  title=

मुंबई : आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ आणि बाबा आमटेंची नात आणि डॉ. विकास यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांनी सोमवारी आत्महत्या केली. ३९ वर्षीय डॉ. शीतल गौतम आमटे-करजगी यांच्या आत्महत्येने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 

आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नैराश्यातून विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. आनंदवनात डॉ. बाबा आमटे यांच्या समाधीस्थळाजवळ सोमवारी संध्याकाळी दफनविधी करण्यात आला. 

ताण..मनावर..कोणाचा ? परिस्थितीचा ? माध्यमांचा ? चर्चेचा ? एक बुद्धिमान मैत्रीण हकनाक गेली....निःशब्द झालोय.. शीतल आमटे  का ग ?

Posted by Saleel Shriniwas Kulkarni on Monday, November 30, 2020

या घटनेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली. यावर संगीतकार, गीतकार, लेखक आणि गायक सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

सलील कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्टला लिहिलं होतं की,'ताण... मनावर... कोणाचा? परिस्थितीचा? माध्यमांचा? चर्चेचा? एक बुद्धिमान मैत्रीण हकनाक गेली... निःशब्द झालोय. शीतल आमटे का ग? '

सोमवारी त्यांच्या आत्महत्येचं वृत्त समोर येण्यापूर्वी, सोमवारी सकाळी 5 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास शीतल आमटे यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी ऍक्रेलिक कॅनव्हास पेंटींगचा फोटो शेअर केला. या फोटोवर चित्राच्या खाली त्यांचं नाव आणि रविवारची म्हणजेच 29 नोव्हेंबरची तारीखही दिसत आहे. 

चित्राचा फोटो पोस्ट करत त्यांनी 'वॉर ऍण्ड पीस' असं कॅप्शन त्यासोबत लिहिलं. युद्ध आणि शांतता असाच त्यांच्या या कॅप्शनचा शब्दश: अर्थ होतो. याच कॅप्शनमुळं अनेकांच्यात मनात कैक प्रश्न निर्माण होत आहेत. शीतल आमटे या माध्यमातून काही सांगू किंवा बोलू इच्छित होत्या का, यामागचं मुख्य कारण काय असेच प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. 

मुळात या ट्विटनंतर काही वेळानं पुढे जेव्हा त्यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली त्यावेळी सर्वांना एकच धक्का बसला आणि नेटकऱ्यांनी त्यांना या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.