तब्बू पत्रकारांच्या 'या' प्रश्नावर भडकली?

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू पत्रकारांच्या एका प्रश्नावर कायम संतापते. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 24, 2018, 09:37 PM IST
तब्बू पत्रकारांच्या 'या' प्रश्नावर भडकली?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तब्बू पत्रकारांच्या एका प्रश्नावर कायम संतापते. 

तो प्रश्न असा की, तू सिंगल का आहेस? कारण तुझ्या सिंगल असण्याचं कारण काय? आपल्याला माहितच आहे तब्बू एक उत्कृष्ठ अभिनेत्री असून ती सिंगल आहे. तब्बूला अनेकदा पत्रकार तिच्या आगामी प्रोजेक्ट बदद्ल विचारतात. ‘तू कुठे गायब होती? तू खूप कमी चित्रपट करतेस यामागचे कारण काय? तू खूपच कमी बघावयास मिळतेस?, तू अद्यापपर्यंत सिंगल का आहेस? असे प्रश्न जेव्हा मला विचारले जातात तेव्हा माझा भयंकर संताप होतो.

मला या सर्व प्रश्नांची चीड वाटते. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून मला सिंगल असण्यावरून विचारणे थोडेसे कमी झाले आहे. कदाचित लोकांनी मला सिंगल स्वीकार केले असावे किंवा वारंवार तोच एक प्रश्न विचारून लोक थकले असावेत, असेही तब्बूने सांगितले. 

आजही तिची क्रेझ बघायला मिळले. सर्वच ठिकाणी तब्बूने आपली छाप सोडली आहे. पण रिअल लाईफमध्ये मात्र तब्बूला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पडद्यावर सर्वांना हिरोसोबत रोमान्स करणारी तब्बू लाईफमध्ये क्लीन बोल्ड झाली आहे. तब्बू ४६ वर्षांची होऊनही अजून अविवाहीत आहे. लग्न न करण्यामागेही एक कारण आहे. जे कदाचित तुम्हाला माहिती नसेल.

असे सांगितले जाते की, तब्बूने तिचं करिअर जोरात असताना एका अभिनेत्यावर जिवापाड प्रेम केलं होतं. ते प्रेम इतकं घट्ट होतं की, त्याची जागा आजपर्यंत दुसरं कुणीही घेऊ शकलं नाही. अनेक अडचणींमुळे तब्बू त्या अभिनेत्यासोबत लग्न करू शकली नाही. आणि त्याच्यानंतर दुस-या कुणाशी तिला लग्नही करावं वाटलं नाही.

तब्बूच्या स्वप्नातील राजकुमार होता साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेता नागार्जुन. एक वेळ अशी होती की, तब्बू आणि नागार्जुनच्या प्रेमाची मोठी चर्चा होत होती. काही मॅगझिननुसार, तब्बू नागार्जुनवर खूप प्रेम करायची. ज्यामुळे ती मुंबई सोडून हैदराबादमध्ये रहायला गेली होती. पण तब्बूचं नशीब इतकं खोटं निघालं की, तिला तिचं ते प्रेम मिळालं नाही.