तैमूर अली खानने सैफवर उचलला हात, व्हिडिओ पाहून सगळेच हादरले

यादरम्यान तैमूरने हातात फोन धरला होता

Updated: Mar 6, 2022, 08:26 PM IST
 तैमूर अली खानने सैफवर उचलला हात, व्हिडिओ पाहून सगळेच हादरले title=

मुंबई : बॉलिवूडचं स्टार कपल करीना कपूर आणि सैफ अली खान नेहमीच चर्चेत असतात, पण आता त्यांचा लाडका मुलगा तैमूर अली खान सगळ्याचं लक्षवेधून घेत आहे.एका व्हिडिओमुळे तैमूरची खूप जास्त चर्चा होत आहे.

मुलगा तैमूरसोबत स्पॉट झालेल्या सैफ आणि करिनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यापैकी एका व्हिडिओमध्ये सैफ आणि करीना कॅफेमधून बाहेर पडताना दिसले, जिथे काही मुले त्यांना दिसली.

यादरम्यान करिनाने त्या मुलांसोबत सेल्फी काढले, तर सैफ तैमूरसोबत कारमध्ये बसल्यानंतर या मुलांसोबत फोटो क्लीक केले.

यादरम्यान तैमूरने हातात फोन धरला होता आणि गर्दीकडे पाहून तो काहीसा गोंधळलेला दिसला. मुलांनी आणखी फोटो काढण्याचा आग्रह धरला तर सैफने त्यांना बाजूला होऊन दरवाजा बंद करण्यास सांगितले.

यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, जो खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सैफ आणि तैमूर एकत्र कारमधून उतरताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सैफच्या हातात एक ग्लास दिसत आहे, जो तैमूर उडी मारून पकडण्याचा प्रयत्न करत आहे. तर सैफ त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे.

या सगळ्यामध्ये तैमूर थोडासा रागावतो आणि सैफवर हात उचलतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी पुन्हा एकदा करीना आणि सैफला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.