व्यायाम करूनही वजन कमी होत नाही?

आजच्या दगदगीच्या जीवनात फीट राहणं गरजेचे आहे. खरंतर, ऑफिसचा वेळ जास्त असल्याने स्वत: ला निरोगी ठेवणे कठीण आहे.

Updated: Jul 5, 2019, 09:33 PM IST
व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? title=

मुंबई : आजच्या दगदगीच्या जीवनात फीट राहणं गरजेचे आहे. खरंतर, ऑफिसचा वेळ जास्त असल्याने स्वत: ला निरोगी ठेवणे कठीण आहे. यात काही लोक त्यांच्या रूटीनमध्ये, खूप लोक वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्यास सुरू करतात. पण, अनेक वेळा जे व्यक्ती वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात, त्यांना काही फायदा होत नाही, त्याचे कारणही समोर आले आहे.

जेव्हा वजन कमी करण्यासाठी आपण नवीन लाइफस्टाईलची सुरवात करतो, तर त्यात कळत- नकळत आपण खूप बदल करतो, काही वेळा त्याचा उलट परिणाम होतो. एका सर्वेनुसार व्यायाम करणारे लोक गरजेपेक्षा जास्त खाण्यास सुरवात करतात, किंवा व्यायामाच्या नावावर चालण्यासारखे साधे व्यायाम टाळतात. यामुळे त्यांचे नुकसान होते. 

याचा नेमका अभ्यास करण्यासाठी अशा लोकांवर अभ्यास करण्यात आला, जे व्यायाम करत नाहीत आणि जे व्यायाम करतात. अभ्यासादरम्यान त्यांच्या कंबरेच्या मापावर लक्ष ठेवण्यात आले. त्यातल्या काही लोकांना त्यांची नॉर्मल लाईफस्टाईल चालू ठेवण्यास सांगितली. 

दुसरीकडे बाकीच्यांना व्यायाम करण्यास सांगितले. व्यायाम करणाऱ्यांनाही दोन गटांमध्ये विभागण्यात आले. एका गटाला आठवड्यात ७०० कॅलरीज कमी करायच्या होत्या, आणि दुसऱ्या गटाला १ हजार ७६० कॅलरिज. 

जे लोक व्यायाम करत नव्हते, त्यांच्यात काही फरक दिसला नाही. दुसरीकडे व्यायाम करणाऱ्या दोन्ही गटात ठरल्यापेक्षा वजन कमी झाले नाही. व्यायाम करणाऱ्यांनी जास्त खाण्यास सुरवात केली. त्यामुळे बर्न केलेल्या कॅलरिजचा काही फायदा झाला नाही. उलट त्यांचे नेहमीपेक्षा चालणे-फिरणे कमी झाले.