Sex करताना महिलांच्या मनात नेमकं काय सुरु असतं? उत्तर वाचून पुरुषही हादरतील

एकिकडे परमसुख आणि दुसरीकड़े विचारांचा काहूर... 

Updated: Mar 15, 2022, 04:34 PM IST
Sex करताना महिलांच्या मनात नेमकं काय सुरु असतं? उत्तर वाचून पुरुषही हादरतील  title=
प्रतिकात्मक छाय़ाचित्र

मुंबई : कोणत्याही दोन व्यक्ती जेव्हा परस्पर सहमतीनं शारीरिक रुपानं एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मनात असणाऱ्या भावना नेमक्या कुठं धावतात हे त्याच व्यक्ती जाणतात. संभोग किंवा sex कडे परमोच्च आनंद म्हणूनही पाहिलं जातं. अनेकदा sex दरम्यान काही विचारही डोक्यात सुरु असतात.

अर्थात याला अपवादही असू शकतात. पण, तुम्हाला माहितीये का sex दरम्यान महिलांच्या मनात येणारे विचार अतिशय वेगळे असतात. इतके की, पुरुषही या उत्तराने हादरतील. 

कारण महिला sex च्या वेळी पुरुषांबद्दल विचार करत नसतात असं एका निरीक्षणातून उघड झालं आहे. मग महिला नेमक्या कोणत्या विचारात असतात? 

कपड्यांचे विचार... 
पुरुषांना हे अगदीच नगण्य वाटेल. पण, महिला कितीही उत्तेजित झालेल्या असल्या तरीही त्या यावेळी त्यांच्या कपड्यांच्या बाबत विचार करत असतात. यातही अंतर्वस्त्रांचा विचार जास्त, कारण त्यांना त्यातही सुंदर आणि सुडौल दिसायचं असतं. 

त्यांच्या अनुषंगानं पुरुषांचं लक्ष वेधण्यासाठी क्यांना ही बाब महत्त्वाची वाटते. 

इंटिमेट पार्ट... 
हायजीन किंवा गुप्तांगांची स्वच्छता हा मुद्दाही महिलांसाठी महत्त्वाचा असतो. संसर्गाची चिंता किंवा आणखी काही प्रश्न यावेळी महिलांना सतावतात. अंघोळ न करता कोणत्याही पुरुषानं महिलांशी संबंध ठेवल्यास आपल्याला STD अर्थात सेक्सुअली ट्रान्समिटेड डिजिस तर होणार नाहीत, हा प्रश्नही महिलांच्या मनात घर करत असतो. 

शरीराचा गंध... 
गंध हा आणखी महत्त्वाचा विचार. अचानकच जोडीदारानं जवळीक साधण्यास सुरुवात केली असता महिला यावेळी लगेचच आपल्या तोंडातून किंवा शरीरातून दुर्गंधी तर येत नाही, हा प्रश्न स्वत:लाच विचारतात. शरीराला येणारा सुगंध sex मध्ये तितकाच महत्त्वाचा भाग ठरतो. 

sex नंतर काय?
महिला ऑरगॅजमच्या नजीक पोहोचत असतानाच आता यापुढे काय असा प्रश्नही त्यांच्या मनात येतो. जोडीदारासोबत पहिल्यांदात शरीरसंबंध ठेवत असताना हा प्रश्न महिलांना कायम सतावत असतो. किंबहुना संबंधानंतर कसं व्यक्त व्हावं हेसुद्धा अनेकजणींना कळत नाही.