कठीण प्रसंगातही रहा पॉझिटीव्ह या १० टिप्सच्या संगे!

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार येत असतात. 

Updated: Mar 16, 2018, 01:14 PM IST
कठीण प्रसंगातही रहा पॉझिटीव्ह या १० टिप्सच्या संगे! title=

मुंबई : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार येत असतात. काही वेळेस आलेल्या कठीण परिस्थितीपुढे आपण हतबल होतो. तर कधी चारी बाजूंनी आलेल्या अडचणींमुळे निराशा निर्माण होते. याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीवर नाही तर कुटुंबातील सदस्यांवरही होतो. अशा कठीण प्रसंगात पॉझिटीव्ह विचार करणे गरजेचे आहे. पण अशावेळी ते फार कठीण होते. म्हणून कठीण प्रसंगातही पॉझिटीव्ह राहण्यासाठी या टिप्स फायदेशीर ठरतील.

१. प्रत्येकाशी प्रेमपूर्वक वागा. समोरच्या व्यक्तीचा सन्मान करा. कोणत्याही व्यक्तीबद्दलचा आकस मनात बाळगू नका.
२. प्रत्येक वेळी परफेक्ट असण्याचा अट्टाहास करु नका. आणि त्यात वेळ वाया घालवू नका.
३. स्वतःसाठी वेळ काढा.
४. भविष्य कोणीच पाहिले नाही. त्यामुळे त्याची चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका.
५. गरजेचे आहे तिथे स्वतःचे मत मांडायला शिका. त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.
६. ज्या गोष्टीची तुम्हाला भिती वाटते किंवा ज्याची शंका तुम्हाला वारंवार सतावते, अशा गोष्टींचा विचार करून घाबरुन जाऊ नका.
७. नकारात्मक विचारांपासून आणि माणसांपासून दूर रहा.
८. वर्तमानात जगा. त्याचा पूरेपूर आनंद लूटा. प्रत्येक क्षण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 
९. कुटुंबासोबत वेळ घालवा. 
१०. नैराश्यापासून दूर राहण्यासाठी रिकाम्या वेळत तुमच्या आवडीचे काम करा. समाजकार्यही तुम्हाला आनंद देईल.