सोनाली बेंंद्रेची प्रकृती आणि कॅन्सरबाबत व्हॉट्सअ‍ॅपवर पसरतायत FAKE NEWS

आजकाल व्हॉट्सअ‍ॅपशिवाय अनेकजण जगूच शकत नाही. 

Updated: Jul 18, 2018, 03:22 PM IST
सोनाली बेंंद्रेची प्रकृती आणि कॅन्सरबाबत व्हॉट्सअ‍ॅपवर पसरतायत FAKE NEWS  title=

मुंबई : आजकाल व्हॉट्सअ‍ॅपशिवाय अनेकजण जगूच शकत नाही. जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून संदेश, व्हिडिओ पाठवण्याची सोय व्हॉट्सअ‍ॅपमुळे मिळाली आहे. मात्र काही समाजकंटकांमुळे व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारे मेसेज जीवावरही बेतले आहे. माहितीची तपासणी न करता केवळ भावनात्मक होऊन मेसेज फॉरवर्ड करण्याचं खूळ वाढलं आहे. 

सोनाली बेंद्रेने काही दिवसांपूर्वी कॅन्सरशी सामना करत असल्याचे जाहीर केलं. काही दिवसांपूर्वी पर्यंत कामामध्ये अ‍ॅक्टिव्ह असणार्‍या अभिनेत्रीला हाय ग्रेड कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला. मग अशामुळे तिच्या प्रकृतीबाबत आणि कॅन्सरबाबत काही चूकीचे मेसेज अफवा वाढवत आहेत. पहा कॅन्सरशी सामना करत असलेली सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर काय म्हणाली

सोनाली बेंद्रेला गर्भाशयाचा कॅन्सर? 

व्हॉटसअ‍ॅपवर झपाट्याने पसरत असलेल्या मेसेजमध्ये सोनाली बेंद्रेला uterine cancer कॅन्सर असल्याची माहिती पसरवली जात आहे. मात्र सोनालीने तिला कॅन्सर असल्याची माहिती दिली आहे. तो कोणता कॅन्सर आहे याबाबत कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. 'या' एका चूकीमुळे सोनाली बेंद्रे गंभीर कॅन्सरच्या विळख्यात ?

व्हॉट्स अ‍ॅपवर फेक मेसेज  

व्हॉट्सअ‍ॅपवर झपाट्याने व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये सोनालीला uterine cancer कॅन्सर असल्याचे सांगितले असले तरीही मेसेजमध्ये पुढे मात्र  सारी माहिती स्त्रियांनी काळी ब्रा वापरणं आणि ब्रेस्ट कॅन्सर याबाबतच अधिक माहिती दिलेली आहे. 

टाटा मेमेरियलच्या नावाने पसरवले जात आहेत मेसेज 

टाटा मेमोरिअलने दिलेल्या माहितीनुसार असे सांगत व्हॉट्सअ‍ॅपवर काही माहिती पसरवली जात आहे. मात्र टाटा हॉस्पिटलने ही माहिती आमच्याकडून दिलेली नाही असा खुलासा केला आहे. कॅन्सरच्या उपचारांसाठी मुंबईत आलात, तर कुठे रहाल ?

ब्रा आणि कॅन्सरचा खरंच संबंध असतो का ? 

उन्हाळ्यात काळी ब्रा वापरणं आरोग्याला धोकादायक असल्याचा अजब दावा व्हॉट्सअ‍ॅपमेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र त्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. तसेच झोपताना ब्रा घालून झोपणं तुम्हांला अनकम्फर्टेबल करते. तसेच वायर्ड ब्रा आणि कॅन्सरचाही थेट संबंध नाही.  चुकीच्या फिटिंगची ब्रा घातल्याने होते हे नुकसान

संबंधित बातम्या 

कॅन्सरमुळे मृत्यू? घाबरू नका, औषधाची लॅब टेस्ट यशस्वी!