मोदींना पराभूत करणं कठीण, पाहा मोदींची कुंडली काय दर्शवते

नरेंद्र मोदींचं भाग्य त्यांच्या बाजुने

Updated: May 23, 2019, 07:06 PM IST
मोदींना पराभूत करणं कठीण, पाहा मोदींची कुंडली काय दर्शवते title=

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सगळ्या टीका आणि आरोपांवर शरसंधान करत पुन्हा एकदा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुमत मिळवलं आहे. पंतप्रधान मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचं भाग्य देखील त्यांच्यासोबत आहे. पंतप्रधान मोदींची कुंडली बरंच काही सांगत आहे. ज्योतिषी प्रविण मिश्रा यांनी याबाबत उलगडा केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या कुंडलीमध्ये जे ग्रह नक्षत्र आहेत. त्यानुसार पंतप्रधान मोदींनी पराभूत करणं इतकंही सोपं नाही. ते अनेक वर्ष विजयाच्या रथावर विराजमान राहतील असं त्यांच्या कुंडलीवरुन दिसत आहे. पीएम नरेंद्र मोदी यांची वृश्चिक रास आहे. वृश्चिक राशीचं चिन्ह विंचू आहे. विंचू हा संवेदनशील आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक या निर्णयांचं देशभरातून अनेकांनी कौतूक केलं. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व पुन्हा एकदा भारतीय नागरिकांनी मान्य केलं.

पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या अनेक निर्णंयामुळे अनेकांना धक्का बसला. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करणं, भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी देणं. पंतप्रधान मोदींचे हे निर्णय़ बरोबर ठरले. 

विंचू हा आत्मविश्वासाने पुढे जातो. पंतप्रधान मोदी देखील संपूर्ण आत्मविश्वासाने निर्णय़ घेतात. टीकाकारांना उत्तर देण्याचं काम देखील पंतप्रधान मोदी एका वेगळ्या अंदाजात करतात.

वृश्चिक राशीचे व्यक्ती गंभीर आणि निडर असतात. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राहणारे लोकं देखील असेच सांगतात की, मोदी हे महत्त्वाचे निर्णय अतिशय बिनधास्तपणे घेतात. जगभरात पंतप्रधान मोदींनी तयार केलेला संपर्क आणि दबदबा ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे.वृश्चिक राशीचे लोकं मेहनती असतात. ते शत्रूंचा देखील निडरपणे सामना करतात. पंतप्रधान मोदींच्या बाबतीत देखील ही गोष्ट दिसते. 

ज्योतिषाच्या आधारावर नरेंद्र मोदी यांची कुंडली ही वृश्चिक राशीची आहे. त्यांच्या कुंडलीमध्ये चंद्राची दशा आहे. डिसेंबर २०२० पर्यंत याचा प्रभाव राहिल. तर शुक्राचा प्रभाव जून २०२० पर्यंत राहणार आहे. चंद्राचं स्थान हे मोदींच्या कुंडलीमधलं भाग्याचं स्थान आहे. लग्न कुंडलीमध्ये मंगळ आहे. 

शुक्र हा नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीमध्य़े सातव्या घरात आहे. बाराव्या घरात स्वामी आणि दहाव्या घरात शनी आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही चांगली वेळ आहे. २०१९ च्या निवडणुकीत मोदींनी मेहनत घेतली आणि निकाल आज जगासमोर आहे.