'धर्मनिरपेक्षते'च्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपची हेगडेंना जोरदार चपराक

  केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या वक्तव्याचा भाजप खासदार डॉ. उदीत राज यांनी विरोध केलाय. अनंतकुमार हेगडे यांची भूमिका संविधानाला धक्का लावणारी असल्याचा दावा उदीत राज यांनी केलाय. हेगडे यांना देशात धर्मतंत्र लागू करायचे आहे का? असा सवालही उदीत राज यांनी उपस्थित केलाय. 

Updated: Dec 26, 2017, 11:41 PM IST
'धर्मनिरपेक्षते'च्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपची हेगडेंना जोरदार चपराक title=
नवी दिल्ली :  केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या वक्तव्याचा भाजप खासदार डॉ. उदीत राज यांनी विरोध केलाय. अनंतकुमार हेगडे यांची भूमिका संविधानाला धक्का लावणारी असल्याचा दावा उदीत राज यांनी केलाय. हेगडे यांना देशात धर्मतंत्र लागू करायचे आहे का? असा सवालही उदीत राज यांनी उपस्थित केलाय. 

केंद्रीय रोजगार राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे सलग दुसऱ्या दिवशी वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत आलेत. राज्यघटनेमधून 'सेक्युलर' अर्थात 'धर्मनिरपेक्ष' हा शब्द काढून टाकण्यासाठीच आम्ही सत्तेवर आलो आहोत, असं वक्तव्य त्यांनी एक जाहीर कार्यक्रमात केलंय. 
 

'धर्माचा-जातीचा उल्लेख करा'

धर्मनिरपेक्ष लोकांना त्यांचा वंश आणि रक्त कुणाचं आहे, याची कल्पना नसते. त्यामुळं प्रत्येकानं आपली ओळख सांगताना आपल्या धर्माचा किंवा जातीचा उल्लेख करायला हवा, असं वक्तव्य अनंतकुमार हेगडेंनी रविवारी केलं होतं. 
 
त्यानंतर आता धर्मनिरपेक्ष हा शब्द राज्यघटनेतून काढून टाकण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटल्यामुळं कर्नाटकमध्ये आरोप-प्रत्यारोपांना ऊत आलाय. 
 
पुढच्या वर्षात कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळं आता हा वाद आणखी भडकण्याची चिन्हं आहेत.