Video: खुनाचा आरोपी भाजप अध्यक्ष, वाह! क्या शान है - राहुल गांधी

 मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. 

ANI | Updated: Apr 24, 2019, 07:43 AM IST
Video: खुनाचा आरोपी भाजप अध्यक्ष, वाह! क्या शान है - राहुल गांधी  title=
संग्रहित छाया

भोपाळ : मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. खूनाचा आरोप (Murder Accused) असणारे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष अमित शाह आहेत. वाह! क्या शान है! अच्छा, जय साहब का नाम सुना है? जय शाह जादूगार आहेत. तीन महिन्यात जय शाह यांनी ५० हजार रुपयांचे ८० कोटी केलेत, असा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. 

गेल्या पाच वर्षांत देशातील जनतेसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्याय केला. त्यामुळे आत्ता आम्ही बेरोजगार युवकांसोबत आम्ही न्याय करणार आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर एका वर्षांत २२ लाख सरकारी पदे भरली जातील. त्याचबरोबर स्थानिक संस्थांमध्ये १० लाख युवकांना नोकरी देणार आहोत, असे आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिले. 

अमित शाह युवकांना सांगतात पकोडे विका, का? देशातील जवानांनी राफेल का बनवू नये? राफेलचे निर्माण देशातील युवकांनी केले पाहिजे, आपल्याला फ्रान्सकडून राफेल घेण्याची गरज नाही असे यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले.