दीपिका पदुकोण 'जेएनयू'त विद्यार्थ्यांच्या भेटीला

'जेएनयूएसयू'ची अध्यक्ष आइशी घोष हिची दीपिकाने गळाभेट घेतली. 

Updated: Jan 7, 2020, 10:03 PM IST
दीपिका पदुकोण 'जेएनयू'त विद्यार्थ्यांच्या भेटीला title=

नवी दिल्ली: दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU)विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर राजधानीतील वातावरण प्रचंड तापले आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून याविरोधात जोरदार निदर्शन सुरु आहेत. या आंदोलनात मंगळवारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सहभागी झाली. दीपिका पदुकोण सध्या तिच्या 'छपाक' या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी दिल्लीत आली आहे. यावेळी तिने जेएनयू कॅम्पसच्या बाहेर जमलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. रविवारच्या हल्ल्यात जखमी झालेली 'जेएनयूएसयू'ची अध्यक्ष आइशी घोष हिची दीपिकाने गळाभेट घेतली. यानंतर दीपिका पदुकोण थोडावेळ विद्यार्थ्यांसोबत थांबली. 

जेएनयू हिंसाचार : हिंदू रक्षा दलाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारही याठिकाणी उपस्थित होता. कन्हैया कुमारने आपल्यान नेहमीच्या शैलीत घोषणा दिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलेच स्फुरण चढले होते. तत्पूर्वी आज दिवसभरात अनुराग काश्यप, अनुराग बसू, तापसी पन्नू, गौहर खान, दीया मिर्झा, विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज, राहुल बोस, रिचा चढ्ढा, अली फजल, रिमा कागतीसह अनेक कलाकारांनी 'जेएनयू'त हजेरी लावली होती.

VIDEO : मुंबईत 'FREE काश्मीर' पोस्टर दाखविणाऱ्या मराठी तरुणीचं स्पष्टीकरण

जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातील वातावरण तापले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या 'गेट वे ऑफ इंडिया'वरही जोरदार निदर्शने सुरु होती. तर कार्टर रोडवर सुरु असलेल्या आंदोलनात  अनुराग कश्यप, राहुल बोस, तापसी पनू, अनुभव सिन्हा, झोया अख्तर, दिया मिर्झा यांनी सहभागी होत विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला होता.