डॉ. पद्माकर विष्णू वर्तक यांचे वृद्धापकाळाने निधन

डॉ. पद्माकर विष्णू वर्तक यांचे वृद्धापकाळाने सकाळी 9 वाजता निधन झाले आहे.

Updated: Mar 29, 2019, 02:07 PM IST
डॉ. पद्माकर विष्णू वर्तक यांचे वृद्धापकाळाने निधन  title=

मुंबई : डॉ. पद्माकर विष्णू वर्तक यांचे वृद्धापकाळाने सकाळी 9 वाजता निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. दोन दिवस अस्वस्थ वाटत असल्याने खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पुण्यातील शनिवार पेठेतील मेहुनपुरा येथे राहत होते. त्यांच्यामागे दोन मुलं आणि एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्राचीन भारतीय विज्ञान हा डॉक्टर वर्तक यांच्या अभ्यासाचा विषय होता. खगोलीय ग्रहांच्या स्थितीला अनुसरुन वर्तक यांनी प्राचीन भारतीय ग्रथांची तारीख निश्चिती केली होती. त्यात  महाभारत आणि रामायणातील सर्व घटनांचीही तारीख निश्चिती त्यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते अनुयायी होते. वेद विज्ञान मंडळाची त्यांनी स्थापना केली आहे.  याच विषयांवर त्यांनी मराठीत 17, हींदी मध्ये 3 आणि इग्रंजी मध्ये 4 पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या सर्व मराठी पुस्तकांचा इग्रंजीमध्ये अनुवादीत झाली आहेत.