e-shram card | ई-श्रम कार्डचा फायदा कोणाला? जाणून घ्या नोंदणी करण्याची पद्धत

केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी श्रमिकांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई - श्रम पोर्टल सुरू केले आहे. 

Updated: Oct 16, 2021, 02:41 PM IST
e-shram card | ई-श्रम कार्डचा फायदा कोणाला? जाणून घ्या नोंदणी करण्याची पद्धत title=

मुंबई : केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी श्रमिकांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ई - श्रम पोर्टल सुरू केले आहे. आतापर्यंत मोठ्या संख्येने श्रमिकांनी ई-श्रम पोर्टलवर (eshram.gov.in)वर रजिस्ट्रेशन केले आहे. हा श्रमिकांचा एक राष्ट्रीय डेटाबेस आहे. ई-श्रम पोर्टलचे लक्ष 38 कोटीहून अधिक श्रमिकांना जोडणे आहे. या लोकांना ई-श्रम कार्ड देण्यात येईल.

कोण बनवू शकतो ई-श्रम कार्ड
असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर ई-श्रम पोर्टलवर कार्डसाठी अर्ज करू शकतात. 

- शेतमजूर
- दूधाचा जोडधंदा करणारा
- फळे-भाजीपाला विकणार विक्रेता
- प्रवासी मजूर
- विट भट्टी मजूर
- मच्छिमार, सॉ मिल कर्मचारी
- बीडली रोलिंग
- लेबलिंग आणि पॅकिंग
- बढई, रेशिम उत्पादन करणारे श्रमिक
- मिठ श्रमिक
- टेनरी वर्कर्स
- बांधकांम मजूर
- चामडे उद्योग मजूर
- न्हावी
- वृत्तपत्र विक्रेता
- रिक्षा चालक
- ऑटो चालक
- घरकाम करणारे
- फेरिवाला
- मनरेगा वर्कर्स

सध्या केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशनच्या अंतिम तारखेबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाही. त्यामुळे श्रमिकसुद्धा कोणत्याही अडचणींशिवाय आपले ई-श्रम कार्ड बनवू शकतील. श्रमिकांनी ई-श्रम पोर्टलवर किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. तसेच या नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही.

12 अंकी युनिक नंबर
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय असंघटित क्षेत्रातील मजूरांसाठी 12 अंकांचा युनिवर्सल अकाऊंट नंबर आणि ई-श्रम कार्ड जारी करणार असून हे कार्ड संपूर्ण देशात मान्य असेल. देशातील कोट्यावधी असंघटित कामगारांना नवी ओळख मिळेल. सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या कार्डचा उपयोग होऊ शकतो.