Election Result 2022 : सर्वात छोटा विजय, भाजपचा हा उमेदवार फक्त 50 मतांनी विजयी

Assembly Election 2022 मध्ये असे काही उमेदवार आहेत ज्यांनी खूपच कमी मतांनी विजय मिळवला आहे. पाहूयात कोण आहेत ते उमेदवार...

Updated: Mar 10, 2022, 09:29 PM IST
Election Result 2022 : सर्वात छोटा विजय, भाजपचा हा उमेदवार फक्त 50 मतांनी विजयी title=

Election Result 2022 : देशातील 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. पण काही उमेदवार असे होते. ज्यांचा खूपच कमी मतांनी विजय झालाय.

मणिपूर

मणिपूरच्या वाबगई येथे भाजपच्या डॉ. उषम देबेन सिंग यांनी काँग्रेसच्या मोहम्मद फजूर रहीम यांचा 50 मतांनी पराभव केला.

पंजाब

डेरा बाबा नानकमध्ये काँग्रेसच्या सुखजिंदर सिंग रंधवा यांनी शिरोमणी अकाली दलाच्या रविकरण सिंग काहलोन यांचा 466 मतांनी पराभव केला.

गोवा

सेंट आंद्रे येथे रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे वीरेश मुकेश बोरकर यांनी भाजपच्या फ्रान्सिस्को सिल्व्हेरा यांचा 76 मतांनी पराभव केला. अत्यंत कमी मतांनी मिळवलेला हा विजय आहे.

संबधित बातमी तब्बल 2.14 लाख मतांनी सर्वात मोठा विजय, पाहा कोण आहे तो उमेदवार