मोफत आधार कार्ड अपडेटसाठी 'ही' शेवटची तारीख! नंतर मोजावे लागतील पैसे

Free Aadhaar Card Update: 14 मार्चपर्यंत तुम्ही ऑनलाइन माध्यमातून मोफत आधार कार्ड अपडेट करु शकता. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 12, 2024, 04:40 PM IST
मोफत आधार कार्ड अपडेटसाठी 'ही' शेवटची तारीख! नंतर मोजावे लागतील पैसे title=
Free Aadhaar Card Update

Free Aadhaar Card Update: आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज मानले जाते. ट्रेनची तिकीट काढायची असेल किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड अनिवार्य असते. दरम्यान यूआयडीएआयने एक महत्वाची माहिती दिली आहे. तुम्ही मागच्या 10 वर्षापासून आधार कार्ड अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर करुन घ्या. ऑनलाइन माध्यमातून केलात किंवा आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट केलात तर तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागते. असे असले तरी यूआयईडीएआय युजर्सना मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची संधी देत आहे. 14 मार्चपर्यंत तुम्ही ऑनलाइन माध्यमातून मोफत आधार कार्ड अपडेट करु शकता. 

कसे कराल आधार अपडेट?

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
यानंतर तुमचा आधार नंबर टाका. आता तुम्हाला एक ओटीपी येईल. 
पुढे जाऊन डॉक्युमेंट्सवर क्लिक करावे लागेल. आणि व्हेरिफाइडवर क्लिक करावे लागेल. 
यानंतर ड्रॉप लिस्टमध्ये आयडी आणि पत्त्याचा पुरावा असलेला फोटो अपलोड करा.
सबमिटवर क्लिक केल्यानंतर रिक्वेस्ट नंबर मिळेल. 
आता रिक्वेस्ट नंबरवरुन आधार अपडेट स्टेटस तपासू शकता.
तुमचे आधार कार्ड काही दिवसातच अपडेट होईल. 

145 कोटींची नोकरी सोडत उभारली 8300 कोटींची कंपनी, महिलेची प्रेरणादायी कहाणी

कोणती माहिती करावी अपडेट?

तुमचे आधार कार्ड 10 वर्षे जुने असेल आणि आतापर्यंत तुम्ही ते अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर अपडेट करुन घ्या. ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करताना नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट करु शकता. बायोमॅट्रीक अपडेटसाठी तुम्हाला आधार केंद्रावरच जावे लागेल. 

बारावी ते पीएचडीपर्यंत मुलींना मिळते शिष्यवृत्ती! पात्रता, अर्ज प्रक्रिया सर्वकाही जाणून घ्या

आधार केंद्रावर भरावे लागेल शुल्क 

तुम्ही 14 मार्च 2024 पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करु शकता. पण तुम्ही ऑफलाइन माध्यमातून किंवा आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करत असाल तर तुम्हाला शुल्क भरावे लागेल. 

आधार केंद्रावर प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. याचा अर्थ तुम्हाला नाव आणि मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. 14 मार्चनंतर तुम्हाला ऑनलाइन अपडेटसाठी शुल्क भरावे लागेल.

कधी 18 रुपयांच्या पगारासाठी भांडी धुवायचे, आज 300 कोटींच्या व्यवसायाचे मालक