OMG ! KGF प्रमाणेच देशात सापडली सर्वात मोठी सोन्याची खाण

Bihar to allow exploration of India’s ‘largest’ gold reserve in Jamui : खनिजांनी समृद्ध बिहारमध्ये जमिनीखाली सोन्याचं अक्षरशः घबाड सापडले आहे. देशातला सर्वात मोठा सोन्याचा साठा भूगर्भात सापडला आहे.  

Updated: May 29, 2022, 10:19 AM IST
OMG ! KGF प्रमाणेच देशात सापडली सर्वात मोठी सोन्याची खाण title=

नवी दिल्ली : Bihar to allow exploration of India’s ‘largest’ gold reserve in Jamui : खनिजांनी समृद्ध बिहारमध्ये जमिनीखाली सोन्याचं अक्षरशः घबाड सापडले आहे. देशातला सर्वात मोठा सोन्याचा साठा बिहारमधील जमुई जिल्ह्याच्या भूगर्भात सापडला आहे. सोन्याची खाण, हे ऐकून आज KGF सिनेमाची आठवण नक्कीच होईल. दोन भागांत आलेल्या KGF मध्ये राकी भाई नावाच्या माणसाने खाणीतून सोने कसे काढायला सुरुवात केली आणि साम्राज्य स्थापन केले, हे या सिनेमात दाखवले.

आता तर सिनेमाशिवाय बिहारमध्ये एक KGF देखील आहे. पुरेसं सोनं आहे की संपूर्ण बिहार श्रीमंत होतो. देशातील 44 टक्के सोने येथे आहे. अनेक वर्षांपासून यावर चर्चा होत आहे. आता 'बिहारच्या KGF'मधून सोने काढण्याची कसरत सरकारकडून केली जात आहे. या ठिकाणी खाणकाम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतलाय. जुमईत भूगर्भात 22 कोटी टनांहून अधिक सोने आणि 37.6 टन इतर मौल्यवान खनिजांचा साठा आहे. खाणकाम करण्यासाठी बिहार सरकार केंद्रीय यंत्रणांशी एक महिन्यात सामंजस्य करार करणार आहे. 

बिहारमधील जमुई जिल्ह्यातील प्रचंड सोन्याच्या साठ्यावर केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्यावर्षी लोकसभेत चर्चा केली होती. त्यानंतर बिहार प्रकाशझोतात आले. आता येथून सोने काढण्यासाठी बिहार सरकारकडून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (GSI) सर्वेक्षणानुसार, जमुईमध्ये सुमारे 222.88 दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे ज्यात 37.6 टन खनिज-समृद्ध धातूचा समावेश आहे, जे देशाच्या सोन्याच्या 44 टक्के आहे.