वर्ल्ड बॅंकेने केले GSTचे कौतूक; ८ टक्के विकासदर गाठेल भारत

भारताने नव्याने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कराचे (GST)वर्ल्ड बॅंकेने कौतूक केले आहे. GSTमुळे भारत ८ टक्के विकास दर गाठेल असा विश्वासही वर्ल्ड बॅंकेने व्यक्त केला आहे.

Updated: Sep 20, 2017, 04:26 PM IST
वर्ल्ड बॅंकेने केले GSTचे कौतूक; ८ टक्के विकासदर गाठेल भारत title=

नवी दिल्ली : भारताने नव्याने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कराचे (GST)वर्ल्ड बॅंकेने कौतूक केले आहे. GSTमुळे भारत ८ टक्के विकास दर गाठेल असा विश्वासही वर्ल्ड बॅंकेने व्यक्त केला आहे.

वर्ल्ड बॅंकेचे भारतातील प्रमुख जुनैद अहमद यांनी हे मत व्यक्त केले आहे. भारतातील कररचनेतील हा एक महत्त्वाचा बदल असून, यामुळे देशाच्या विकासाला गती प्राप्त होईल असे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र, आर्थिक वर्ष २०१६/१७ च्या तुलनेत सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदर ७.१ वरून ५.७ वर घसरला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना अहमद यांनी सांगितले की, भारत आज आठ टक्क्यांहून अधिक विकासदर गाठण्याच्या टप्प्यात आहे. कारण देशांतर्गत कररचना बदलण्यासाठी भारताने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अर्थात हा निर्णय घेणे हे अत्यंत धाडसाचे होते. पण, भारताने हे धाडस दाखवले, असेही अहमद यांनी म्हटले आहे.