केरळात निम्म्या भागात पूरस्थिती, २९ लोकांचा मृत्यू, ५४ हजार पेक्षा जास्त बेघर

केरळच्या निम्म्याहून अधिक भागांत मुसळधार पावसामुळे हाहाकार उडालाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 10, 2018, 10:49 PM IST
केरळात निम्म्या भागात पूरस्थिती, २९ लोकांचा मृत्यू, ५४ हजार पेक्षा जास्त बेघर

थिरुवनंतपुरम : केरळच्या निम्म्याहून अधिक भागांत मुसळधार पावसामुळे हाहाकार उडालाय. धरण, जलाशयांत मोठा पाणीसाठा झालाय. तर नंद्याना पूर आला आहे. अनेक ठिकाणी महामार्ग कोलमडले आहेत. कित्येक घरे पाण्यात बुडाली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सतत पावसामुळे जवळजवळ ५४ हजार लोक बेघर झाले आहेत आणि किमान २९ लोकांचा मृत्यू झालाय. तर अनेक ठिकाणी डोंगरही खचल्यामुळे घरे जमिनदोस्त झालेत.

राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. नद्यांना पूर आल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. पेरियार नदीत पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर, १४ जिल्ह्यांत मदतीसाठी पाच तुटकड्या तैनात करण्यात आल्यात. भारतीय नौदलाची मदतही घेण्यात आली आहे. कोचीतील वेलिंग्टन बेटाचा काही भाग पूर्णपणे पाण्याखाली बुडण्याची शक्यता आहे. राज्याच्या जवळजवळ ४० नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेय. यात २५ जणांचा मृत्यू झालाय. आपात्कालीन परिस्थिवर लक्ष्य ठेवण्यात आले असून ४३९ संकरण शिबिरे उभारण्यात आलेय. या ठिकाणी प्रभावीत आणि बाधित भागातील लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close