अण्णा हजारेंनी भाजपसोबत सेटिंग केली- हार्दिक पटेल

 अण्णा हजारेंनी भाजपसोबत सेटिंग केल्याचा आरोप पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलाय. शेतक-यांचं आंदोलन दडपण्यासाठीच अण्णांनी आंदोलन केल्याचा दावाही हार्दिक पटेलांनी केलाय.

Updated: Mar 26, 2018, 12:00 PM IST
अण्णा हजारेंनी भाजपसोबत सेटिंग केली- हार्दिक पटेल  title=

नवी दिल्ली : अण्णा हजारेंनी भाजपसोबत सेटिंग केल्याचा आरोप पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलाय. शेतक-यांचं आंदोलन दडपण्यासाठीच अण्णांनी आंदोलन केल्याचा दावाही हार्दिक पटेलांनी केलाय.

आरोप फेटाळले 

आपण मोदीविरोधक असल्यामुळे भाजपच्या सांगण्यावरून अण्णांनी आपल्याला व्यासपीठावर येऊ देण्यास मनाई केल्याचा आरोपही हार्दिक पटेलांनी केलाय. 
तर अण्णांचे निकटवर्तीय विनायक पाटील यांनी हार्दिक पटेलांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

शिष्टमंडळ भेटणार 

राज्यातील मंत्री गिरीष महाजन केंद्र सरकारच्या या शिष्टमंडळात असतील. त्यामुळे आता या भेटीकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलं आहे.  गिरीश महाजन यांच्यासमवेत महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री देखील शिष्टमंडळात सामील असेल.

निर्णयाचा तपशिल देणार 

 हे शिष्टमंडळ सरकारनं कृषीमालाच्या हमीभावासाठी घेतलेल्या निर्णयांचा तपशिल अण्णांसमोर सादर करेल...तसच यावेळी काही राज्यात उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या निर्णयाची अंमलबजाणीसंदर्भातली माहितीही अण्णांना देण्यात येईल.