सीमेनजीक चीनच्या कुरापती सुरुच; आता असं काही केलं की.....

म्हणजेच एलएसीजवळ चीनी सैन्याच्या हालचाली 

Updated: May 12, 2020, 02:34 PM IST
सीमेनजीक चीनच्या कुरापती सुरुच; आता असं काही केलं की..... title=
संग्रहित छायाचित्र

लेह : भारत- पाकिस्तान नियंत्रण रेषेपाशी असणाऱ्या अस्थिर वातावरण असतानाच काही दिवसांपूर्वी सिक्कीम येथील नाकू ला सेक्टरमध्ये चीन आणि भारतीय सैन्यदलातील जवान एकमेकांनी भिडल्याचं वत्त समोर आलं होतं. दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या वादंगामध्ये काही जवान जखमीही झाले होते. 

चीनच्या सैन्यासोबतच्या या सामन्याच्या चर्चा शमत नाहीत, तोच चीनकडून पुन्हा एकदा कुरापती केल्या जात असल्याचं वृत्त समोर आलं. यावेळी लडाखमध्ये असणाऱ्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणजेच एलएसीजवळ चीनी सैन्याच्या हालचाली पाहायला मिळाल्या. 

चीनचे चॉपर भारताच्या हद्दीनजीक येताना दिसले. ज्यामुळे खबरदारी म्हणून भारतीय वायुदलाला गस्तीसाठी आणलेलं लढाऊ विमान बाहेर काढावं लागलं. एलएसीनजीक चीनचे चॉपर्स ये-जा करत असल्याचं लक्षात येताच भारताकडून हा निर्णय घेण्यात आला होता. 

वाचा : अवघ्या काही तासांच्या तिकीट विक्रीतून रेल्वेने जमवला इतका गल्ला 

'चीनी सैन्याचे हॅलिकॉप्टर लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलच्या अगदी जवळून घोंगावत होते. त्यांच्या एकंदर हाचलाली पाहून त्यानंतरच भारतीय वायुदलाकडून त्या भागात तातडीने गस्त घातली गेली', अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी एएनआयला दिली. 

वायुदलाकडून सातत्यान 30MKI सुखोई या लढाऊ विमानाने आणि काही इतर विमानंगी लडाखजवळून गस्त घालण्यासाठी उड्डाण भरल्याचं सांगण्यात येत आहे. 

 

यापूर्वीही चीनकडून भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी

भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा हा चीनचा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वीची भारतीय हद्दीत येणाऱ्या काही भागावर आपला हक्क सांगण्यासाठी चीनकडून यकाही कुरापती गेल्याचं पाहिलं गेलं आहे चीनकडून सातत्याने होणाऱ्या या हालचाली पाहता वेळोवेळी भारताकडून त्याचं उत्तर देण्यात येत आहे.